जयंत पाटील म्हणाले, “पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार,” संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया,“आधी…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 18:03 IST2023-04-30T18:02:30+5:302023-04-30T18:03:06+5:30

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू आहे.

ncp leader jayant patil commented next cm of maharashtra ncp uddhav thackeray group sanjay raut commented politics | जयंत पाटील म्हणाले, “पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार,” संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया,“आधी…”

जयंत पाटील म्हणाले, “पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार,” संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया,“आधी…”

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही काही जण इच्छुक असल्याचं समोर आलंय. दरम्यान, अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील अशा आशयाचे बॅनरही झळकले होते. 

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं होतं. महाराष्ट्रातील पुढील मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल असं विधान त्यांनी केलं. यानंतर महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून यावर प्रतिक्रियाही येतक आहे. दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“सत्ता येईल, मग महाविकास आघाडीची बैठक होईल. त्यानंतर नक्कीच मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होईल. त्या विषयी दुमत नाही. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं तोदेखील महाविकास आघाडीचा निर्णय होता. अशाप्रकारचे निर्णय भविष्यात घेण्यात येतील” असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.

काय म्हणाले होते पाटील?
“मला समाधान या गोष्टीचं आहे की महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार हे जवळपास सर्वांनीच मान्य केलंय. एवढ्या वेगानं आमचा पक्ष पुढे जातोय. म्हणून मला खात्री आहे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात भविष्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल,” असं जयंत पाटील म्हणाले.

Web Title: ncp leader jayant patil commented next cm of maharashtra ncp uddhav thackeray group sanjay raut commented politics