शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

खडसे दोन दिवसांत कागदपत्रांसह धमाका करण्याची शक्यता; कोणाकोणाच्या अडचणी वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 2:34 PM

एकनाथ खडसे बीएचआर प्रकरणी महत्त्वाची माहिती कागदपत्रांसह देणार

जळगाव: भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर संस्था प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू असल्याने यादरम्यान बोलणे योग्य ठरणार नाही. आपल्याकडे याविषयीची कागदपत्रे, पत्रव्यवहार असून दोन दिवसात ही सर्व माहिती पत्रकार परिषद घेऊन देतो अशी माहिती माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. या प्रकरणात जिल्ह्यातील दिग्गजच अधिक असून संस्थेची मालमत्ता कवडीमोल भावात घेतलेल्या आमदार, खासदार, माजी मंत्री याची पण माहिती असून ती देणार असल्याचेही खडसे म्हणाले. दरम्यान एकनाथ खडसे यांनी याविषयी तक्रारी करून ते आता कोणावर फास आवळत आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.

बीएचआर संस्थेतील अपहार, गुंतवणूकदारांची देणी न देणे, संस्थेच्या मालमत्तेची कवडीमोल भावाने विक्री करणे व पुणे येथे दाखल गुन्ह्या संदर्भात जळगावात आर्थिक गुन्हे शाखेकडून दोन दिवसांपासून चौकशी सुरू आहे‌. यासंदर्भात खडसे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, याविषयी आपण राज्य सरकारकडे २०१८पासूनच १५ ते १६ तक्रारी केल्या आहे. सोबतच खासदार रक्षा खडसे यांच्या लेटरहेडवरदेखील दिल्ली येथे व अॅड. कीर्ती पाटील यांनीदेखील तक्रारी केल्याचे खडसे यांनी सांगितले.

या पूर्वीच्या राज्य सरकारने कारवाई थांबवलीदोन वर्षांपूर्वी तक्रारी केल्या तरी या पूर्वीच्या राज्य सरकारने कारवाई थांबवून ठेवण्याचा आरोपदेखील खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केला. या गैरव्यवहार प्रकरणी प्रथम राज्य सरकारकडे आपण तक्रारी केल्या होत्या. मात्र बीएचआर संस्था मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी कायदा २००२ प्रमाणे या संस्थेवर कारवाईचे अधिकार केंद्र सरकारला असल्याने राज्याचे सहकार आयुक्त यावर कारवाई करू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी हा चौकशी अहवाल सरकारला पाठविला होता. त्यानंतरही राज्य सरकारने चौकशी थांबवून ठेवली होती असे खडसे यांचे म्हणणे आहे.

दोन दिवसात दिग्गजांची नावे समोरया प्रकरणात जिल्ह्यातील खासदार, आमदार, माजी मंत्रीदेखील अडकले असून त्यांनी संस्थेची मालमत्ता कवडीमोल भावात घेतली आहे. या सर्वांचीदेखील चौकशी होणार असून आत्ताच माहिती दिल्यास चौकशीत हस्तक्षेप केल्यासारखे होईल. ते योग्य होणार नाही म्हणून चौकशी संपल्यानंतर दोन दिवसात सर्व माहिती व कागदपत्रेदेखील देतो असे खडसे म्हणाले.हा घोटाळा हजारो कोटींचा असल्याचे सांगितले जात असून यात जिल्ह्यातील दिग्गज अडकल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. सोबतच आता खडसे यांनी दोन दिवसात संपूर्ण कागदपत्रेदेखील देतो असे सांगितल्याने जिल्ह्यातील राजकारण काय वळण घेते व कोणावर कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस