शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
3
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
4
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
5
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
6
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
7
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
8
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
9
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
10
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
11
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
12
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
13
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
14
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
15
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
16
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

“जागावाटपाचे काम ९९ टक्के पूर्ण, महायुती एकत्रितपणे जागा जाहीर करणार”: अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 12:20 PM

NCP DCM Ajit Pawar News: मनसेचा महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय अंतिम झाल्यास महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे दिसू शकतात, अशी चर्चा आहे.

NCP DCM Ajit Pawar News: २८ मार्चला मुंबईत महायुतीची एकत्रित पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी कुणाला किती जागा मिळणार हे जाहीर केले जाईल. जागावाटपाचे आतापर्यंत ९९ टक्के काम पूर्ण झाले असून आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. तसेच रायगड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. 

मीडियाशी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या, तेव्हा भाजपाच्या २३ जागा आल्या. शिवसेनेच्या १८ जागा आल्या, राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळाल्या. एक जागा नवनीत राणा यांची होती. त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. त्यामुळे आम्हाला फार कमी जागा मिळणार, अशा चर्चा करत माध्यमांमधून गैरसमज पसरवण्याचे काम करण्यात आले, अशी टीका अजित पवारांनी विरोधकांवर केली.

नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्राचे बळ पाठीशी उभे करू

राज्यातील लोकसभा प्रचारक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. अन्य स्टार प्रचारकांच्या नावावर चर्चा सुरू आहे. अशा पद्धतीने आम्ही लोकांसमोर जाणार असून, लोकांचा विश्वास आम्ही जिंकू आणि नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्राचे बळ त्यांच्या पाठीशी उभे करू, असा निर्धार व्यक्त करत, जाहीरनाम्यावर काम सुरू आहे. लवकरच तो दिला जाईल. स्थानिक प्रश्न जाहीरनाम्यात यावेत अशी भूमिका आहे, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेली प्रत्यक्ष चर्चा तसेच मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपाप्रणित महायुतीत सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय लवकरच घेणार आहेत, असे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी मनसेच्या नेत्यांची बैठक बोलावल्याची माहिती देण्यात आली आहे. या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत महायुतीतील सहभागाबाबत निर्णय झाला तर महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे व्यासपीठावर दिसण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुती