शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 6:24 AM

राहुल गांधी यांना विश्वास; 'भाजप'च्या हातातून निवडणूक निसटल्याचा केला दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: पंतप्रधानांच्या हातातून लोकसभा निवडणूक हळूहळू निसटत चालली असून, आता देशातील तरुणांचे - लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी ते नवीन काहीतरी नाटक करण्याचा प्रयत्न करतील. मात्र, तरुणांनी विचलित होऊ नये. ४ जूनरोजी इंडिया आघाडीचे सरकार सत्ता स्थापन करणार असून, आम्ही १५ ऑगस्टपर्यंत आम्ही ३० लाख नोकऱ्या देण्याचे काम सुरू करणार असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.

हिंदूची लोकसंख्या घटल्याचा दावा करणारा एक अहवाल येताच त्यांनी एक व्हिडीओ प्रसारित केला. तरुण हे देशाची ताकद आहे. चार-पाच दिवसांत काहीतरी नाटक करून तुमचे लक्ष विचलित करण्याचा - प्रयत्न होईल. मात्र, तुम्ही तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.

आम्ही नोकरीची गॅरंटी देणारदेशातील तरुणानो, ४ जून रोजी 'इंडया'चे सरकार स्थापन होत आहे. आम्ही गॅरंटी देतो की, १५ ऑगस्टपर्यंत आम्ही ३० लाख रिक्त सरकारी पदांवर भरतीचे काम सुरू करू, भाजपच्या खोट्या प्रचाराने विचलित होऊ नका, आपल्या मुद्द्यांवर ठाम राहा. 'इंडिया'चे ऐका. द्वेष नव्हे तर नोकरी निवडा.- राहुल गांधी, काँग्रेस नेते

देशात सध्या बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या असून, दोन कोटी तरुणांना रोजगार देऊ, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले होते. मात्र, ते खोटे बोलले आणि त्यांनी नोटबंदी केली. चुकीचा जीएसटी लागू केला आणि उद्योगपतींसाठी काम केले. आम्ही नोकरीची गॅरंटी योजना आणत आहोत. सरकार येतात ३० लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचे काम सुरू करू, असे त्यांनी म्हटले आहे.

कुटुंब नियोजनाचा कायदा तत्काळ लागू करादेशात तत्काळ कुटुंब नियोजनाचा कायदा लागू केला पाहिजे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने दिलेल्या अहवालातील निष्कर्षांवर सर्वांनीच गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.-साक्षी महाराज, खासदार, भाजप

भाजप देशावरील महत्त्वाच्या प्रश्नांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवू पाहात आहे. लोकांच्या आयुष्याशी निगडित असलेल्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांची सुरक्षा अशा विषयांवर भाजप बोलायला तयार नाही. या मुद्द्यांवर चर्चा होऊ नये, असा त्यांचा प्रयत्न असतो.- प्रियांका गांधी, सरचिटणीस, काँग्रेस

१९५० ते २०१५ या कालावधीत भारतात हिंदूंची संख्या ७.८२ टक्क्यांनी घटली आहे, असा निष्कर्ष पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या एका अहवालात काढण्यात आला आहे. ही आकडेवारी पाहिली तर विरोधी पक्ष भारताला इस्लामी देश बनविण्याच्या तयारीला लागल्याचे दिसून येते. काँग्रेसने भारताला धर्मशाळा बनविले. बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या यांची मतपेढी वाढविण्याचा या पक्षाचा प्रयत्न आहे. आता मुसलमानांना आरक्षण देण्याच्या गोष्टी केल्या जात आहेत.- गिरीराज सिंह, केंद्रीय मंत्री

मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येबाबतचा अहवाल हा व्हॉट्सअॅप विद्यापीठाचा आहे. अहवाल अभ्यासूनच प्रतिक्रिया देईन.-असदुद्दीन ओवैसी, 'एआयएमआयएम'चे प्रमुख

आर्थिक सल्लागार परिषदेने तयार केलेल्या अहवालाद्वारे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा व विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपचा हा अजेंडा आहे. गेली १० वर्षे या पक्षाच्या केंद्र सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. २०११च्या नंतर जनगणना करण्यात आली नाही. ती २०२१ साली होणे आवश्यक होते. मात्र, २०२४ साल उजाडले तरी जनगणना झालेली नाही.-तेजस्वी यादव, 'राजद नेते

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४