शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 6:05 AM

Maharashtra Politics: मित्रांनीच डोकेदुखी वाढविली, आता ऐक्यासाठी नेतेमंडळींची सुरू आहे भिरभिर

- यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात अद्याप दोन टप्प्यात २४ मतदारसंघातील मतदान बाकी असताना महायुतीचे विविध मतदारसंघांमधील नेते, आमदार हे मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे चित्र दिसत नसल्याने चिंता वाढली आहे. वरिष्ठ पातळीवरून मनोमिलनाचे प्रयत्न सुरू आहेत; पण अद्याप हवे तसे यश त्यात आलेले नाही. नाशिक, दिंडोरीत नाराजी उघडपणे बोलून दाखविली जात आहे.

भाजपचे राज्यातील एक मोठे नेते म्हणाले की, तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये उत्तम समन्वय राहावा, असे प्रयत्न आम्ही करत आहोत. मित्रपक्षांचे उमेदवार आहेत, तिथे आम्ही पूर्ण मदत करत आहोत. शेवटी आम्ही वधूपक्षाचे लोक आहोत, मोदींना पंतप्रधान करायचे असल्याने आम्हाला कुठेही कमी पडून चालत नाही, असे हा नेता म्हणाला.

अजित पवार यांच्यासोबत अजित पवार गटाचे काही आमदार नाहीत, अशी जोरदार चर्चा आहे. या आमदारांचे प्रमुख कार्यकर्ते शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारात उतरले असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच या मतदारसंघातील येवल्याचे आमदार असलेले राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत नसल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी जाहीरपणे केला आहे. नाशिकमध्ये उमेदवारी न मिळाल्याची भुजबळ यांची नाराजी कायम असल्याचे म्हटले जाते. निवडणुकीत या नाराजीचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसू नये यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून मनधरणी केली जाण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेकडे लक्ष...नंदुरबार मतदारसंघात भाजपच्या डॉ. हीना गावित यांच्या प्रचारात अजित पवार गट उतरला आहे; पण शिंदेसेनेचे तेथील प्रमुख नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी सक्रिय दिसत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी नंदुरबारमध्ये सभा होत असताना रघुवंशी काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता आहे. रघुवंशी आणि आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यात नेहमीच संघर्ष होत आला आहे. गावित यांच्या कन्या डॉ. हीना यांनी रघुवंशी यांची भेटही घेतली; पण त्याचा फायदा झालेला दिसत नाही. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रघुवंशी यांना समजावले असल्याचे समजते.

जळगावी केळी कोण खातंय?जळगाव, रावेर मतदारसंघांत शिंदेसेनेचे आमदार, नेते भाजप उमेदवारांच्या पाठीशी एकदम भक्कमपणे उभे असल्याचे चित्र अजूनही दिसत नाही. उद्धवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी जळगावमध्ये येऊन शिंदेसेनेच्या आमदारांवर आरोप केल्यानंतर शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी, 'मी आतापर्यंत सक्रिय नव्हतो; पण आता महायुतीला जिंकवणारच' असे जाहीर केले. त्यांनी मुक्ताईनगरचे खडसेंचे कट्टर विरोधक शिंदेसमर्थक आमदार चंद्रकांत पाटील यांची गुरुवारी भेट घेतली आणि रक्षा खडसे यांच्या प्रचारात सक्रिय होण्यास सांगितले.शिंदेसेनेचे आमदार भाजप-शिवसेना युतीमध्ये २०१९ ला लढले तेव्हा भाजपचे बंडखोर त्यांच्याविरुद्ध उभे होते. 'आज तुम्ही आमचा पाठिंबा मागताय; पण तेव्हा तुम्ही आम्हाला त्रासच दिला होता,' अशी आठवण या आमदारांनी भाजपच्या नेत्यांना जाहीरपणे करून दिलेली होती. धुळ्यात सुरुवातीला नाराजी होती, आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, अशी शिंदेसेनेची आणि अजित पवार गटाची नाराजी होती, ती आता दूर झाली आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाMahayutiमहायुतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४