“नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे”; अजित पवारांनी व्यक्त केला निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 17:31 IST2023-10-07T17:30:46+5:302023-10-07T17:31:10+5:30

Ajit Pawar News: गणेशोत्सव चांगला पार पाडला, आता नवरात्र आणि दसरा चांगला व्हावा, यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या.

ncp dcm ajit pawar said narendra modi should third term as prime minister | “नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे”; अजित पवारांनी व्यक्त केला निर्धार

“नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे”; अजित पवारांनी व्यक्त केला निर्धार

Ajit Pawar News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या तयारीने वेग घेतला आहे. नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार असणार आहेत. राज्यात अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर अनेक राजकीय गणिते बदलल्याचे सांगितले जात आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाअजित पवार गट मिळून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीविषयी भाष्य करताना, नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे, असे निर्धार व्यक्त केला आहे. 

उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत, साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेतले. हजारोंच्या संख्येने भाविक येतात तिथे सुविधा दिलेल्या आहेत. आणखी काय सुविधा द्यायला पाहिजे याचा विचार केला पाहिजे. तेव्हाच काही लोकांनी सांगितले की, प्लॅन तयार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक होत असते. आराखडा तयार केला आहे. पुढील बैठकीत तो आराखडा मंजूर केला जाईल हा शब्द देतो, असे म्हणत अजित पवार यांनी उपस्थितांना आश्वासन दिले. 

तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे 

अजित पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्धार अजित पवार यांनी बोलून दाखलवला. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. तुम्ही तिथे काय करतात? असे काही लोक विचारतात. आम्ही इथे आमची कामे करतो, असे म्हणत अजित पवार यांनी आगामी निवडणुकीबाबत प्रतिक्रिया दिली. तसेच गणेशोत्सव चांगला पार पाडला, आता नवरात्र आणि दसरा चांगला पडावा, यासाठी प्रयत्न करा. चांगला पाऊस पडून धरणे भरावीत, अशीच इच्छा सप्तश्रृंगी देवीकडे व्यक्त केली. तशी प्रार्थना केली, असे अजित पवार यांनी सांगितले. 


 

Web Title: ncp dcm ajit pawar said narendra modi should third term as prime minister