शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

माझे घर समजून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची टोपेंच्याच भावाच्या घरावर दगडफेक; लोणीकरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2023 8:39 PM

बिनविरोध निवडणूक होण्यासाठी जालना जिल्हा बँक निवडणुकीतील विचित्र युती केली खरी परंतू अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून वेगळाच विरोध सुरु झाला आहे.

बिनविरोध निवडणूक होण्यासाठी जालना जिल्हा बँक निवडणुकीतील विचित्र युती केली खरी परंतू अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून वेगळाच विरोध सुरु झाला आहे. माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गाडीची काच फोडून शाईफेक करण्याचा प्रकार भाजपा नेते बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. याचे पडसाद जालण्यात सायंकाळीही उमटले. परंतू, टोपे समर्थकांनी लोणीकरांचे घर समजून टोपेंच्या भावाच्या घरावरच दगडफेक केल्याचा प्रकार घडला आहे. 

विचित्र युतीत राजेश टोपेंच्या कारच्या काचा फुटल्या, लोणीकर म्हणाले मी भरून देतो, पण...सायंकाळी सहा साडेसहा वाजेच्या सुमारास माजी पालकमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या घरावर आमदार राजेश टोपे यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची बातमी संपूर्ण जिल्ह्याभरासह राज्यात पसरली. या चर्चेला उधाण आल्यामुळे तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतू, काहीच वेळात स्वतः बबनराव लोणीकर यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या घरावर नाही तर टोपेंच्याच भावाच्या घरावर दगडफेक झाल्याचे स्पष्ट केले. 

माझ्या घरावर कुठल्याही प्रकारची दगडफेक झाली नसून माझे घर समजून त्यांनी राजेश टोपे यांचे बंधू सतीश टोपे यांच्या घरावरच दगडफेक केल्याचे लोणीकर यांनी स्पष्ट केले. तसेच राजेश टोपे यांना माझ्या घरावर दगडफेक करायला दहा जन्म घ्यावे लागतील, असा टोलाही लगावला. 

राजेश टोपे यांचे बंधू सतीश टोपे व जालना जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकीमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली व त्या ठिकाणावरून सर्व नागरिकांना बाजूला करत परिस्थिती नियंत्रणात आणली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे. 

टॅग्स :Babanrao Looneykarबबनराव लोणीकरRajesh Topeराजेश टोपेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा