Chandrakant Patil on Nawab Malik: 'नवाब मलिक डी गँगशी संबंधित असतील तर...',चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 03:57 PM2022-02-23T15:57:37+5:302022-02-23T15:58:21+5:30

Chandrakant Patil on Nawab Malik: '...तर नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला लावणार'

Nawab Malik | NCP | ED | Chandrakant Patil | If Nawab Malik is associated with D gang then, its matter of nations security, says Chandrakant Patil | Chandrakant Patil on Nawab Malik: 'नवाब मलिक डी गँगशी संबंधित असतील तर...',चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केली शंका

Chandrakant Patil on Nawab Malik: 'नवाब मलिक डी गँगशी संबंधित असतील तर...',चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केली शंका

googlenewsNext

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना चौकशीनंतर ईडी(ED)ने अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेनंतर राजकारण तापण्याची शक्यता आहे. सकाळी नबाव मलिकांना चौकशीसाठी बोलावले होते, तेव्हापासूनच दोन्ही बाजुचे नेते एकमेकांवर टीका करत होते. भाजप नते चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil)  यांनीही मलिकांच्या अटकेनंतर गंभीर शंका उपस्थित केली आहे.

भाजप सुड्याच्या भावनेतून केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने कारवाई करत असल्याचा आरोप महाविकास आघाडी करत आहे. दरम्यान, नवाब मलिक जर दोषी असतील तर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी भाजपची आहे. दरम्यान, 'नवाब मलिक यांचा डी गँगशी संबंध असेल, तर ही देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर बाब आहे', अशी शंका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केली आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, '93 च्या बॉम्बस्फोटातील नरसिंह राव यांचा अहवाल अजून बाकी आहे. हा बाहेर आल्यास आज जे बोलत आहेत त्यांची बोलती बंद होईल. तुम्हाला राजकीय सूडबुद्धीने कारवाई वाटत असेल तर न्यायालयात जा, तिथे तुम्हाला योग्य न्याय मिळेल. 

...तर न्यायालयात जा
अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर आधी यांनी आमच्यावर टीका केली, नंतर कोण देशमुख? असे वागू लागले. त्यामुळे विरोधकांचा आवाज हळूहळू क्षीण होत आहे. या प्रकरणात चौकशी सुरू असल्यामुळे आधिक बोलणं योग्य नाही. तुम्ही न्यायालयाचे दार ठोठवा, तसेही तु्म्ही अनेक केसेस हरले आहात, असंही पाटील म्हणाले.

'...तर मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला लावणार'
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला लावणार, असे म्हटले आहे. नवाब मलिक यांचे कारस्थान आता जनतेसमोर येत आहे. अशा व्यक्तीला तांत्रिकदृष्ट्या मंत्रिमंडळात राहण्याचा हक्क आहे का, हे तपासले पाहिजे. ईडीच्या चौकशीची माहिती समोर आल्यानंतर भाजपकडून नक्कीच नवाब मलिक यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीसाठी मागणी केली जाईल, असे सोमय्या यांनी स्पष्टच सांगितले.

Web Title: Nawab Malik | NCP | ED | Chandrakant Patil | If Nawab Malik is associated with D gang then, its matter of nations security, says Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.