Navneet Rana And Ravi Rana: राणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; राज्य सरकारच्या उत्तराकडे सर्वांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 08:31 AM2022-04-29T08:31:42+5:302022-04-29T11:43:15+5:30

Navneet Rana And Ravi Rana: राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार असून, राज्य सरकार मुंबई सत्र न्यायालयात आपले उत्तर देणार आहे.

Navneet Rana | Ravi Rana | Hearing on Rana's bail application today; All eyes on the state government's answer | Navneet Rana And Ravi Rana: राणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; राज्य सरकारच्या उत्तराकडे सर्वांच्या नजरा

Navneet Rana And Ravi Rana: राणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; राज्य सरकारच्या उत्तराकडे सर्वांच्या नजरा

googlenewsNext

मुंबई: राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या नवनीत (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. 

राज्य सरकार काय उत्तर देणार?
यापूर्वी 26 एप्रिल रोजी सुनावणी पार पडली होती, त्यावेळी झालेल्या सुनावणी दरम्यान, राणा दाम्पत्याच्या जामीन याचिकेवर 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश सत्र न्यायालयाच्यावतीने राज्य सरकारला देण्यात आले होते. आज राणा दाम्पत्याच्या जामीन याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयात राज्य सरकार काय उत्तर देणार, हे पाहणे महत्वाचे आहे. 

काय आहे प्रकरण? 
काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती. राणांच्या घोषणेनंतर राज्यभरातून तीव्र पडसाद उमटले. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. अखेर राणांनी आपली घोषणा मागे घेतली, पण त्यानंतर पोलिसांनी राणांना अटक केली. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या खासदार नवनीत राणा भायखळा कारागृहात आहेत, तर आमदार रवी राणा तळोजा कारागृहात आहेत.  

Web Title: Navneet Rana | Ravi Rana | Hearing on Rana's bail application today; All eyes on the state government's answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.