शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत राष्ट्रवादी, औरंगाबादेत महायुती बहुमतापासून दूर

By admin | Updated: April 23, 2015 17:31 IST

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकांचे निकाल जाहिर झाले असून या दोन्ही निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही.

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. २३ - संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकांचे निकाल जाहिर झाले असून या दोन्ही निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. नवी मुंबईत सर्वाधिक ५२ जागा मिळविणारा राष्ट्रवादी पक्ष ठरला असला तरी सत्ता स्थापण्यासाठी राष्ट्रवादीला काँग्रेसह अपक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. तर दुसरीकडे औरंगाबाद महापालिकेत महायुतीला सर्वाधिक ५१ जागा मिळविण्यात यश आले असले तरी बहुमतापासून महायुती दूर आहे. महत्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत एमआयएमने सर्वांचं लक्ष वेधत २५ जागांवर विजय मिळवित विरोधी पक्षाची जागा काबिज केले आहे.औरंगाबाद महापालिका निवडणुकीत एमआयएम किती जागा मिळविणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. औरंगाबादमध्ये सर्वाधिक नुकसान राष्ट्रवादीचे झाले असून राष्ट्रवादीला केवळ ३ जागा मिळविण्यात यश आले आहे. काँग्रेसच्या हक्काची मते एमआयएमकडे गेल्याने काँग्रेसला केवळ १० जागा मिळविता आल्या. तर या ठिकाणी अपक्षांचा सुध्दा बोलबाला राहिल्याचे दिसून आले. अपक्षाने २४ जागावर विजय मिळविला असल्याने सत्ता स्थापनेसाठी महायुतीला अपक्षांची खरी गरज लागणार आहे. कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या ते खालीलप्रमाणे ...औरंगाबाद महापालिका निवडणूक निकाल 

शिवसेना - २९ जागा 

एमआयएम - २५ जागा 

भाजप - २२ जागा 

काँग्रेस - १० जागा 

बसपा - ०५ जागा 

राष्ट्रवादी - ०३ जागा 

रिपब्लिकन पक्ष ०१ जागा 

अपक्ष - १८ जागा 

एकूण - १११ जागा 

नवी मुंबई महापालिका निवडणूक निकाल

राष्ट्रवादी - ५३ जागा

शिवसेना - ३७ जागा

काँग्रेस - १० जागा

भाजप - ०६ 

इतर पक्ष ०५ जागा

एकूण - १११ जागा