Nashik's experiment in municipal elections failed | नाशिकमध्ये पालिका निवडणुकीत महाशिवआघाडीचा प्रयोग फसला
नाशिकमध्ये पालिका निवडणुकीत महाशिवआघाडीचा प्रयोग फसला

मुंबई : राज्यातील ११ महापालिकांमधील महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत लातूर आणि उल्हासनगरमध्ये सत्तांतर झाले. या दोन्ही महापालिकांवरील भाजपचे वर्चस्व संपले. नाशिकचा महापौर करण्याचा शिवसेनेचा प्रयोग फसला. लातूरमध्ये काँग्रेसचा महापौर झाला. विदर्भात अपेक्षेप्रमाणे भाजपचेच महापौर झाले.

लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांनी भाजपाचे अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे यांचा दोन मतांनी पराभव केला. तर भाजपाचे चंद्रकांत बिराजदार यांनी बंडखोरी करीत काँग्रेसच्या पाठिंब्यावर उपमहापौरपदी विजय मिळविला. दोन नगरसेवकांनी काँग्रेसला मतदान केल्याने सत्ताधारी भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

नाशिकला भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठीचा महाशिवआघाडीचा प्रयोग फसला. महापालिकेतील सत्ता आबाधित राखण्यात भाजपला यश आले. महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी, तर उपमहापौैरपदी भिकूबाई बागुल यांची बिनविरोध निवड झाली.

विदर्भात महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपने बाजी मारली. नागपूरमध्ये भाजपचे संदीप जोशी, मनीषा कोठे तर अकोला येथे भाजपच्या अर्चना मसने, राजेंद्र गिरी तसेच अमरावतीत भाजपचे चेतन गावंडे व कुसूम साहू आणि चंद्रपूरमध्ये राखी कंचर्लावार व राहुल पावडे विजयी झाले. परभणीत काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे व भगवान वाघमारे विजयी झाले.

पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुरळीधर मोहोळ व उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे तर पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाच्या उषा ऊर्फ माई ढोरे व तुषार हिंगे बिनविरोध निवडून आले. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी महाविकास आघाडीचा पॅटर्न राबविला. मात्र, त्यांच्याकडे बहुमत नव्हते.

नाशिकला मनसे भाजपसोबत
नाशिक महापालिकेत भाजपचे ६५ नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत असतानाही दहा ते पंधरा नगरसेवक फुटल्याची चर्चा होती. हाच फायदा उठवून शिवसेनेने विरोधकांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आणि कॉँग्रेस, राष्टÑवादी तसेच मनसेला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला.
हाच फायदा उठवून शिवसेनेने विरोधकांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आणि कॉँग्रेस, राष्टÑवादी तसेच मनसेला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेनेची मजल बहुमतापर्यंत जाईल, असे दिसत होते.
मात्र राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाचही नगरसेवकांनी भाजपला साथ देण्याचा निर्णय शुक्रवारी सकाळी जाहीर केला, तर सात नगरसेवक असलेल्या काँग्रेसने उपमहापौरपदासाठी शिवसेनेची अडवणूक केली.

Web Title: Nashik's experiment in municipal elections failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.