शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

सूनेला जिवंत जाळणाºया सासूला सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 16:21 IST

नाशिक : परपुरुषाशी बोलते या कारणावरून सूनेसोबत वाद घातल्यानंतर रॉकेल टाकून जिवंत जाळणारी सासू आरोपी हौसाबाई निवृत्ती माळेकर (५५,राक़ापाची करंजाळी, ता़दिंडोरी, जि़नाशिक) हिस जिल्हा व सत्र न्यायाधीश एम़एच़मोरे यांनी मंगळवारी (दि़१०) दहा वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ या खटल्यात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड विद्या जाधव यांनी ...

ठळक मुद्दे परपुरुषाशी बोलते या कारणावरून सूनेसोबत वाद रॉकेल टाकून जिवंत जाळले़ दिंडोरी तालुक्यातील कापाची करंजाळी येथील घटना

नाशिक : परपुरुषाशी बोलते या कारणावरून सूनेसोबत वाद घातल्यानंतर रॉकेल टाकून जिवंत जाळणारी सासू आरोपी हौसाबाई निवृत्ती माळेकर (५५,राक़ापाची करंजाळी, ता़दिंडोरी, जि़नाशिक) हिस जिल्हा व सत्र न्यायाधीश एम़एच़मोरे यांनी मंगळवारी (दि़१०) दहा वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ या खटल्यात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड विद्या जाधव यांनी काम पाहिले़दिंडोरी तालुक्यातील कापाची करंजाळी येथील हौसाबाई माळेकर ही मुलगा विलास व सून अनिता यांच्यासोबत राहत होती़ सुनेचे परपुरुषासोबत बोलणे खटकत असल्याने त्यांच्यात नेहेमी वाद होत़ २५ एप्रिल २०१६ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास सून अनिता ही जनावरांच्या गोठ्याची साफसफाई करीत होती़ सासू हौसाबाई हिने पुन्हा सून अनिता हिला तु परपुरुषाशी का बोलत असते कारणावरून वाद घातला़ या वादानंतर संतप्त हौसाबाईने अनिताला खेचत घरात नेले व तिच्या अंगावर रॉकेल टाकून काडी लावून पेटवून दिले व घटनेनंतर पळून गेली़पती विलास व शेजारील नागरिकांनी पेटलेल्या अनिताला विझवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले़ यामध्ये ६४ टक्के जळालेल्या अनिताचा उपचारादरम्यान १ मे २०१६ रोजी मृत्यू झाला़ मृत्युपुर्व जबाबात तिने सासूने पेटवून दिल्याचा जबाब दिला होता़ या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात सासूवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला़ अ‍ॅड़ विद्या जाधव यांनी १२ साक्षीदार तपासून सासूविरोधात न्यायालयात सबळ पुरावे सादर केले़ न्यायालयाने सासूला दोषी धरीत खूनाच्या गुन्ह्याऐवजी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी धरून दहा वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़