आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 03:29 PM2023-10-13T15:29:12+5:302023-10-13T15:30:23+5:30

पुढच्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाही, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 

Narendra Modi will not be the Prime Minister after the upcoming Lok Sabha elections; Prakash Ambedkar's claim | आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा

आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा

आगामी २०२४ ला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक गोष्ट अधोरिखित असून ती म्हणजे नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान राहणार नाही. सरकार कोणाचे येईल हे आज सांगणं कठीण आहे. नरेंद्र मोदी यांना जर पंतप्रधान व्हायचे असेल तर भाजपाला २७२ जागा जिंकाव्या लागतील. मात्र ते कठीण असून पुढच्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाही, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 

सरकार कोणाचे येईल हे आज सांगता येणार नाही, मोदींना जर तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचे असेल तर भाजपाला २७२ जागा जिंकाव्या लागतील, पण  २००चा आकडा ते पार करतील असे दिसत नाही. त्यामुळे एक निश्चित आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान राहणार नाहीत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ साली येवल्यातील मुक्तीभूमी येथे धर्मांतराची घोषणा केली. मुक्तिभूमी येथे धम्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी समता सैनिक दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. याच धर्मांतर घोषणेचा ८८ व्या वर्धापन दिनाला प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावत पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. 

Web Title: Narendra Modi will not be the Prime Minister after the upcoming Lok Sabha elections; Prakash Ambedkar's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.