शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

नंदिनीच्या यशाने मुरगूडमध्ये जल्लोष

By admin | Updated: February 4, 2015 00:41 IST

अंतिम लढतीत कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या हरियाणाच्या अनुभवी मल्ल रितूबरोबर कुस्ती झाली. सुरुवातीपासून खडाखडी झालेली ही कुस्ती तब्बल सहा मिनिटे चालली

मुरगूड : केरळमध्ये सुरू असलेल्या ३५ व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ४८ वजन किलो गटामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुरगूड (ता. कागल) येथील नंदिनी बाजीराव साळोखे हिने रौप्यपदक पटकाविले. ही बातमी समजल्यानंतर मुरगूडमध्ये नागरिकांनी जल्लोष केला. या यशामुळे नंदिनीची आंतरराष्ट्रीय कुस्ती शिबिरासाठी निवड झाली आहे. मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक कुस्ती आखाड्यात (साई) नंदिनी प्रशिक्षण घेत असून शिवराज कॉलेजमध्ये बारावीच्या वर्गात शिकत आहे. नंदिनीचे वय या स्पर्धेच्या तुलनेत कमी असून म्हणजेच कॅडेट व ज्युनिअरचे वय असून या प्रौढांच्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने सहभाग घेऊन पदकाची कमाई केली. नंदिनीची पहिली लढत आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेती पंजाबच्या प्रीतीबरोबर झाली. प्रीती ६ गुणाने आघाडीवर असताना नंदिनीने तिला गदालोट या डावावर चितपट करून विजय मिळवला. दुसऱ्या फेरीमध्ये नंदिनीची लढत दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त शिक्षा हिच्याबरोबर झाली. शिक्षाने ४-३ अशा एका गुणाने आघाडी घेतली होती. त्याचवेळी नंदिनीने अगदी चपळाईने फ्रंट साल्तो डावावर तिला चितपट करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम लढतीत कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या हरियाणाच्या अनुभवी मल्ल रितूबरोबर कुस्ती झाली. सुरुवातीपासून खडाखडी झालेली ही कुस्ती तब्बल सहा मिनिटे चालली. यामध्ये रितूने चार गुणांची आघाडी घेतल्याने १०-६ अशा गुण फरकाने नंदिनीला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या महिला पथकामध्ये पहिलेच पदक मिळाल्यामुळे खेळाडूंच्यातही आनंद होता. नंदिनीला महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक व ‘साई’चे मुख्य प्रशिक्षक दादासो लवटे, संध्या पाणकुडे यांचे मार्गदर्शन मिळाले, तर साई आखाड्याचे संस्थापक सचिव सदाशिवराव मंडलिक, प्रा. संजय मंडलिक, वस्ताद सुखदेव येरूडकर, ‘शिवराज’चे प्राचार्य महादेव कानकेकर, क्रीडाशिक्षक प्रा. रवींद्र शिंदे यांचे प्रोत्साहन लाभले. (वार्ताहर)आईच्या डोळ्यांत आनंदाश्रूनंदिनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुरगूडमध्ये आपल्या आई सरिताबरोबर राहते. नंदिनीचे वडील बाजीराव यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाल्याने सरिता यांना मोलमजुरी करून नंदिनीचा कुस्तीचा खर्च पूर्ण करावा लागतो. नंदिनीच्या यशाने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.