शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई

By admin | Updated: May 15, 2015 02:11 IST

महापालिका ज्या गतीने नालेसफाईचे काम करीत आहे ती गती बघितल्यानंतर पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई महापालिका निश्चितच

मुंबई : महापालिका ज्या गतीने नालेसफाईचे काम करीत आहे ती गती बघितल्यानंतर पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई महापालिका निश्चितच पूर्ण करेल, असा आशावाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. महानगरपालिकेने हाती घेतलेल्या नालेसफाई कामांची महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्यासमवेत गुरुवारी संयुक्त पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.गत १० वर्षांपासून महापालिका अत्यंत चांगले काम करीत असून, मुंबईत कुठेही पाणी तुंबणार नाही याची दक्षता महापालिका घेईल. पम्पिंग स्टेशनची कामे जोरात सुरू असून क्लिव्हलॅण्ड बंदर आणि लव्हग्रोव्ह पम्पिंग स्टेशन येत्या पावसाळ्यापूर्वी कार्यान्वित करण्यात येणार आहे. उर्वरित पम्पिंग स्टेशनची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येणार आहेत. लव्हग्रोव्ह पम्पिंग स्टेशनमुळे मौलाना आझाद रोड, जमशेटजी जीजीभॉय रोड, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, केशवराव खाड्ये मार्ग, डॉ. दादासाहेब भडकमकर रोड, परशुराम पुप्पाला रोड, आर.एस. निमकर मार्ग, डॉ. आनंदराव नायर रोड, एन.एम. जोशी मार्ग, बी.डी.डी. चाळी, डॉ. ई. मोझेस रोड, साने गुरुजी मार्ग, पठ्ठे बापूराव मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. अ‍ॅनी बेझंट रोड या ठिकाणी पाण्याचा निचरा होणार आहे. त्याचबरोबर क्लिव्हलॅण्ड बंदर पम्पिंग स्टेशनमुळे दादर मार्केट, दादर रेल्वे स्थानक, भवानी शंकर रोड, म्हात्रे पेन वर्क्स, दादर सिवरेज आॅपरेशन्स सेंटर, फितवाला लेन, सनमिल लेन, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन रोड, ड्रेनेज चॅनेल रोड, एन.एम. जोशी मार्ग, शंकरराव नरम मार्ग, शिवराम अमृतवार मार्ग, दादासाहेब फाळके मार्ग, सेनापती बापट मार्ग या विभागांतील पाण्याचा निचरा होणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी २ टर्मिनलजवळील लेलेवाडी नाला, कुर्ला टर्मिनस व रेल्वे क्वॉटर्सच्या जवळील कारशेड नाला, बी.के.सी. १ इमारतीजवळील एम.टी.एन.एल. पूल, आय.एल.एफ.एस. इमारतीजवळील प्रेमनगर पातमुख आदी नाल्यांची पाहणी या वेळी करण्यात आली.दरम्यान, काळबादेवी परिसरातील गोकूळ हाउस या इमारतीला लागलेल्या भीषण आगीप्रसंगी तेथील रहिवाशांचे जीव वाचविताना व कर्तव्य पार पाडताना गंभीर जखमी झालेले मुंबई अग्निशमन दलातील उप अग्निशमन अधिकारी सुधीर अमिन यांचे निधन झाल्याने उर्वरित नालेसफाई कामाचा पाहणी दौरा रद्द करण्यात आला. (प्रतिनिधी)