शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

‘नागपूर पोलीस आयुक्तांचा सत्कार करणार’ -राधाकृष्ण विखे पाटील

By admin | Updated: January 26, 2017 04:53 IST

नथुराम गोडसेवरील नाटकासाठी पोलिसांनी गोळीबाराची जाहीर धमकी देण्याप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली असून, नागपूर पोलीस आयुक्तांवर कारवाई न झाल्यास

मुंबई : नथुराम गोडसेवरील नाटकासाठी पोलिसांनी गोळीबाराची जाहीर धमकी देण्याप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली असून, नागपूर पोलीस आयुक्तांवर कारवाई न झाल्यास त्यांना जनरल डायरची पदवी देऊन सत्कार करू, अशी घोषणा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.बुधवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्वयंघोषित राष्ट्रभक्तांच्या कार्यकाळात शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना जाहीर फलक लावून गोळीबाराची धमकी देण्याची घटना ब्रिटिश राजवटीची आठवण करून देणारी आहे. आपल्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनात एखाद्या साध्या आंदोलनात गोळीबाराची जाहीर धमकी देणारा फलक घेऊन पोलीस उभे असल्याचे मी कधीही पाहिले नाही. ही कार्यपद्धती पाहता पोलिसांना नागपुरात जालियानवाला बाग हत्याकांडाची पुनरावृत्ती करायची होती की काय, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी सांगितले. नथुरामचे नाटक आणि तत्पूर्वी आरबीआयसमोरील आंदोलनाच्या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांवर जनरल डायरसारखी दडपशाही करण्याची नागपूर पोलिसांची मानसिकता दिसली. यावरून विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांवरही तोफ डागली. गृह खात्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी या गंभीर घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा. परंतु, भ्रष्ट मंत्र्यांना ‘क्लीन चिट’ची खिरापत वाटणारे मुख्यमंत्री स्वत:ला वेगळा न्याय देण्याची शक्यता नाही, असेही विखे म्हणाले.(विशेष प्रतिनिधी)