शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यासमोर महिलेची हत्या

By admin | Updated: September 26, 2016 18:05 IST

सक्करदरा पोलीस ठाण्यासमोर राहणा-या एका महिलेची निर्घृण हत्या झाली.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 26 - सक्करदरा पोलीस ठाण्यासमोर राहणा-या एका महिलेची निर्घृण हत्या झाली. ऐन पोलीस ठाण्यासमोर ओमनगरात सोमवारी दिवसाढवळ्या हत्येसारखा गंभीर गुन्हा घडल्याने नागपुरात प्रचंड खळबळ उडाली असून, पोलिसांनाही जबर हादरा बसला आहे.शशिकला नाशिकराव ठाकरे (वय ६५) असे मृत महिलेचे नाव असून, पोलीस ठाण्यासमोरच्या इमारतीत त्या सहपरिवार राहत होत्या. प्राथमिक माहितीनुसार, त्यांचा मुलगा आणि सून नोकरीवर असल्यामुळे ते कर्तव्यावर गेले. तर, नातू शाळेत गेले. दुपारी ३.३०च्या सुमारास नातू शाळेतून परतला तेव्हा त्याला आजी रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसली. त्याने आरडाओरड करून शेजा-यांना कळविले.शेजा-याने इमारतीच्या वरच्या माळ्यावरून पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या कर्मचा-यांना आरडाओरड करून हत्या झाल्याचे कळविले. त्यामुळे अवघे सक्करदरा पोलीस ठाकरे यांच्या सदनिकेत पोहचले. दरम्यान, पोलीस ठाण्यासमोर वृद्धेची हत्या झाल्याची वार्ता शहरात वायुवेगाने पसरली. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. मोठ्या सख्येत वरिष्ठ पोलीस अधिका-यांनीही घटनास्थळी धाव घेतली. गुन्हेशाखेसह आजूबाजूच्या ठाण्यातील पोलिसांनाही घटनास्थळी बोलवून घेण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर आरोपीचा पत्ता लागला नव्हता. मात्र, मौल्यवान चिजवस्तू लंपास करण्याच्या हेतूनेच लुटारूने ही हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलीस वर्तवित होते.