शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीसाठी स्वत:सारख्या दिसणाऱ्याचा केला खून

By admin | Updated: July 5, 2017 02:53 IST

मोठ्या प्रमाणात झालेले कर्ज मिटवण्यासाठी विम्याची रक्कम मिळावी म्हणून स्वत:सारख्याच दिसणाऱ्या अनोळखी इसमाचा खून करून

लोकमत न्यूज नेटवर्कलोणी काळभोर : मोठ्या प्रमाणात झालेले कर्ज मिटवण्यासाठी विम्याची रक्कम मिळावी म्हणून स्वत:सारख्याच दिसणाऱ्या अनोळखी इसमाचा खून करून फरार झालेल्यास लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले. तब्बल चार महिन्यांनी अकोला परिसरात त्याला पकडले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.याप्रकरणी दीपक कुंडलिक चौधरी (वय ३५, रा. पेठ-नायगाव, ता. हवेली) यास अटक केली आहे. त्याचा साथीदार दादा ऊर्फ अनिल साईनाथ चौधरी याच्यासह आणखी दोघांना यापूर्वी अटक केली आहे.चौधरीला व्यवसायात तोटा झाल्याने तो कर्जबाजारी झाला होता. त्याने मोठ्या रकमेचा विमा उतरवला होता. तो लाभ मिळवण्यासाठी त्याने आपल्याच खुनाचा बनाव रचला. ८ मार्च रोजी पहाटे आपल्यासारख्या दिसणाऱ्या एका अनोळखी इसमाचा आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने लोखंडी गज व दगडांच्या साह्याने खून केला. तो खून आपलाच आहे, असे वाटावे म्हणून तोंडाचा चेंदामेंदा केला. मृतदेहास स्वत:चे कपडे घातले. खिशात मोबाईल फोनसह आधार कार्डही ठेवले. यानंतर चौधरी फरार झाला. तपासात हा मृतदेह दुसऱ्याच कोणाचा असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला.दीपकच्या मागावर लोणी काळभोर पोलीस होते. परंतु, आपल्या वास्तव्याच्या ठिकाणात तो सतत बदल करत असल्याने हाती लागत नव्हता. तो अकोला परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने स्थानिक पोलिसांची मदत घेऊन त्यास अटक केली.