शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

१०० टक्के अनुदानासाठी पालिका कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By admin | Updated: March 2, 2015 01:47 IST

राज्यातील ड प्रवर्गातील नगरपालिकांना १०० टक्के अनुदान देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेने

मुंबई : राज्यातील ड प्रवर्गातील नगरपालिकांना १०० टक्के अनुदान देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेने ९ मार्चला आझाद मैदानावर धडक मोर्चाची हाक दिली आहे. यावेळी धरणे देऊन हजारो कर्मचारी सरकारकडे अनुदानाची मागणी करणार आहेत.वारंवार आश्वासन देऊनही आधीच्या सरकारने अनुदान दिला नसल्याचा आरोप संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश तांडेल यांनी केला आहे. २००० सालापूर्वीच्या कंत्राटी, रोजंदारी आणि मानधनावर काम करणाऱ्या कामगारांना कायम सेवेत घेण्याची मागणी तांडेल यांनी केली आहे. सद्यस्थितीत नगरपालिका कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन सहा महिन्यांपर्यंत थकत असल्याचे त्यांनी सांगितले. अनुदानाअभावी पालिकांकडे पैसा नसल्याने कर्मचाऱ्यांना वेतनासाठी सरकारकडे भीक मागावी लागत आहे. त्यामुळे सरकारने अनुदानाची तरतूद केल्यास कर्मचाऱ्यांना वेळीच वेतन आणि पेन्शन मिळेल, असा तांडेल यांचा दावा आहे. सहा संवर्ग कर्मचाऱ्यांच्या पदस्थापना, ज्येष्ठता याद्या, पदोन्नती व वरिष्ठ वेतन श्रेण्या निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. परिणामी शासनाने ही सर्व प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याची संघटनेची मागणी आहे. भोकर, आर्णी, नेर या नगरपंचायतींसोबत नव्याने येऊ घातलेल्या १३८ नगरपंचायतींमध्ये संबंधित विभागातील ग्रामपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. (प्रतिनिधी)