शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मिळकतींसाठी महापालिकेची अभय योजना

By admin | Updated: August 2, 2016 01:14 IST

घरमालकांनी स्वत:हून पालिकेकडे नोंद करून घेतल्यास त्यांना करपात्र रकमेवर दहा टक्के दंडाची रक्कम माफ करण्याची अभय योजना महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आली

पुणे : करआकारणी न झालेल्या आणि वापरात बदल केलेल्या मिळकतींची घरमालकांनी स्वत:हून पालिकेकडे नोंद करून घेतल्यास त्यांना करपात्र रकमेवर दहा टक्के दंडाची रक्कम माफ करण्याची अभय योजना महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. ही योजना १ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी लागू राहील. या योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ महापालिकेच्या टोल फ्री क्रमांक १८००१०३०२२२ वर फोन केल्यास मिळकत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पुढील कार्यवाही पार पाडली जाणार आहे. शहरातील अनेक घरांची मिळकत कर विभागाकडे नोंदणी झालेली नाही तसेच काही मिळकतींची निवासी अशी नोंद असताना प्रत्यक्षात त्याचा व्यावसायिक कारणांसाठी वापर सुरू आहे. याचा जीआएस पद्धतीने सर्व्हे करण्याचे काम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या सर्व्हेमध्ये अशा मिळकती उजेडात आल्यास त्यांना मोठ्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकेल. या पार्श्वभूमीवर, ही कारवाई टाळण्यासाठी नागरिकांना अभय योजनेच्या माध्यमातून एक संधी देण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. या वेळी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, मिळकत कर विभागप्रमुख सुहास मापारी उपस्थित होते. मिळकत कर विभागाच्या वतीने पालिकेच्या संकेतस्थळावरच एक स्वतंत्र वेब पोर्टल तयार करण्यात आले असून, त्यावरही अभय योजनेत सहभागी होण्यासाठी माहिती देता येईल. कुणाल कुमार म्हणाले, ‘‘करआकारणी करून न घेतलेल्या मिळकती आढळून आल्यास त्यांच्या करपात्र रकमेवर दरवर्षी दहा टक्के दंड (प्रशासकीय शुल्क किंवा विलंब शुल्क) आकारला जातो. अभय योजनेच्या माध्यमातून दंडाच्या रकमेतून सूट दिली जाणार आहे. त्यांच्याकडून केवळ करपात्र रक्कम घेतली जाईल. जीआयएस मॅपिंगमध्ये सर्व मिळतींचा डाटा पालिकेकडे उपलब्ध होणार आहे. त्या वेळी दंडात्मक कारवाईला सामोरे जाण्याऐवजी अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.’’शहरात सध्या ८ लाख २५ हजार मिळकती असल्याची महापालिकेकडे नोंद झाली आहे. यापेक्षा जास्त मिळकती शहरात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)प्रत्येक घराला मिळणार क्रमांकशहरात जीआय मॅपिंगद्वारे प्रत्येक घराचा सर्व्हे करून त्याला एक विशिष्ट क्रमांक दिला जाणार आहे. घराचा पत्ता सांगण्यासाठी सध्या जवळपासची खूण, गल्ली, रस्ता यांचे नाव सांगावे लागते. प्रत्येक घराला क्रमांक दिला गेल्यानंतर केवळ त्या क्रमांकाच्या आधारे नागरिकांपर्यंत सर्व सुविधा पोहोचू शकणार आहेत. जीआयएस सर्व्हेमुळे मिळकत कर विभागाकडे नोंद नसलेल्या व वापरात बदल झालेल्या सर्व मिळकतींच्या माहितीचा डाटा महापालिकेकडे जमा होणार आहे.महापालिकेला मिळकत आकारणीतून ८०० ते ९०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. मागील आर्थिक वर्षात मिळकत कर विभागाने थकलेल्या मिळकत कराबाबत अभय योजना जाहीर करून ११०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. चालू आर्थिक वर्षात मिळकत कराचे १,६०० कोटी रूपये उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती कुणाल कुमार यांनी दिली.