शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मुंडे कुटुंबियांविरुद्ध उमेदवार देणार नाही

By admin | Updated: June 21, 2014 23:48 IST

मुंडे कुटुंबातील उमेदवार असेल, तर राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करणार नाही. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले़

मुंडे कुटुंबियांविरुद्ध उमेदवार देणार नाही-शरद पवारांची गोपीनाथ मुंडेंना आदरांजलीमुंबई - बीड लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत मुंडे कुटुंबातील उमेदवार असेल, तर राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करणार नाही. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले़ दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शनिवारी एनसीपीए सभागृहात सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. मुंडे यांचे क˜र राजकीय विरोधक मानले जाणारे राष्ट्रवादीचे नेते पवार यांनी मुंडे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडले. ते म्हणाले, सामान्य कुटुंबातून येऊन मुंडेंनी जी उंची गाठली त्यासाठी प्रचंड कष्ट आणि जनसामान्यांच्या प्रश्नांशी समरस व्हावे लागते, अभ्यास करावा लागतो आणि कार्यकर्त्यांचा संच उभा करावा लागतो. मुंडे यांनी ते केलं. एक नेता म्हणून त्यांच्या संघर्षाचा विषय निघेल तेंव्हा माझ्या उल्लेखाशिवाय ती ओळख पूर्ण होणार नाही. एकाचवेळी साखर कारखानदार, कामगार आणि ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या हितासाठी मुंडे यांनी विधायक भूमिका पार पाडली आहे, असे पवार यांनी सांगितले.भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह म्हणाले, वंचितांच्या विकासाचा प्रयत्न करणे, हीच गोपीनाथ मुंडे यांना खरी श्रध्दाजंली ठरेल. पंकजा मुंडे समर्थपणे गोपीनाथरावांचा वारसा चालवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर एक भाऊ म्हणून कायम तुझ्या पाठीशी उभा असेन, असा धीर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंकजाला दिला.यावेळी रिपाइं अध्यक्ष खा. रामदास आठवले, खा. राजू शे˜ी, मनसे गटनेता आ. बाळा नांदगावकर, आ. विनायक मेटे, महादेव जानकर आणि मुंबई भाजपाध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)मुंडे आणि घड्याळमुंडे आणि घड्याळ्याचे नाते कधी जमलेच नाही. मग ते वेळेचे घड्याळ असेा की, राष्ट्रवादीचे! वेळ न पाळण्याच्या त्यांच्या सवयीची राजकीय चेष्टाही झाली. मात्र, कधीही वेळ न पाळणारा हा नेता मृत्यूची भेट घेण्यासाठीच वेळेपूर्वी का गेला, हे न उलघडणारे वेदनादायी कोडे आहे, अशी भावना शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली तेव्हा अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.