शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी जागवल्या मुंडेंच्या आठवणी

By admin | Updated: June 4, 2014 00:32 IST

केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर त्यांनी एके काळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना पदभार वाहिलेल्या गृह खात्यातील माजी अधिकार्‍यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या.

डिप्पी वांकाणी/मुंबई : केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर त्यांनी एके काळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना पदभार वाहिलेल्या गृह खात्यातील माजी अधिकार्‍यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या. अनेकांनी त्यांचे वर्णन कायम समस्यांवर उपाय सुचवणारे, जनतेच्या आणि पोलिसांच्या प्रश्नांत सारखाच रस घेणारे आणि कधीही भेटता येऊ शकतील असे मंत्री म्हणून केले. मुंडे यांच्या कार्यकाळात राज्याचे पोलीस महासंचालक असलेले अरविंद इनामदार यांनी सांगितले की, मुंडे यांची स्मरणशक्ती अफाट होती आणि एखादी गोष्ट ते क्वचित विसरत. त्यांच्याशी अनेक महिन्यांपूर्वी झालेल्या चर्चेचे संदर्भ ते सहज देत. ते नेहमी आमच्यासाठी उपलब्ध असत. नक्षलवाद असो, अंडरवर्ल्ड असो किंवा दहशतवाद, त्यांची विषयाची जाण उत्तम होती. त्यांच्याकडे कोणतीही समस्या घेऊन गेलो की ते सदैव हसतमुखाने त्यावर उपाय सांगण्यास तयार असायचे. इनामदार यांनी असेही सांगितले की, मुंडेंना पोलिसांच्या खडतर आयुष्याची जाण होती आणि ते पोलिसांच्या हितासाठी आणि पोलीस दलासाठी अधिक परिश्रम घेण्यास तयार असलेले मंत्री म्हणून आठवणीत राहतील. सध्या ही पद्धत वापरात नसली तरी मुंडे यांनीच इन्स्पेक्टर आणि तहसिलदार हे हुद्दे समकक्ष बनवले. त्यांनी पोलीस दलात २२,००० नव्या पदांच्या भरतीला मान्यता दिली. त्यामुळे कित्येक कॉन्स्टेबल आणि इन्स्पेक्टर्सना पदोन्नतीची संधी मिळाली. मुंडे कायम मुले आणि ज्येष्ठ नागरिकांबद्दल संवेदनशील होते. त्यांनी कॉन्स्टेबल्सना अधिका-यांसारख्याच टोप्या देण्याची योजना मांडली होती. पण ती अस्तित्वात येऊ शकली नाही. मुंडे यांच्याकडे गृह खात्याचा कार्यभार असताना मुंबईचे पोलीस आयुक्त असलेले आर. डी. त्यागी म्हणाले, मुंडे यांनी त्यांना आणि पोलीसांना कामात नेहमीच मोकळीक दिली. त्यांना काम पूर्ण होण्यात स्वारस्य असे. पण दैनंदिन व्यवहारात कधीही ढवळाढवळ केली नाही. त्यांच्या काळात शहरात क्वचितच दंगली किंवा गँगवॉरच्या घटना घडल्या. त्यांच्या कार्यकाळात पोलीस दलाची कामगिरी उत्तम होती.