शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकर विनापरवाना सुसाट

By admin | Updated: September 5, 2016 05:08 IST

विनापरवाना वाहनधारक मुंबईत मोठ्या प्रमाणात धावत असून, त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई : विनापरवाना वाहनधारक मुंबईत मोठ्या प्रमाणात धावत असून, त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विनापरवाना चालकांना आळा बसविण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यामुळे २0१२पासून मोठ्या प्रमाणात केसेसची नोंद होत आहे. आतापर्यंत एकूण ३२ हजार ६८४ केसेस दाखल झाल्या आहेत.खार येथील पेट्रोल पंपावर विनाहेल्मेट दुचाकीस्वारांची नोंद करताना एका अल्पवयीन दुचाकीस्वाराला विलास शिंदे यांनी हटकले. त्यानंतर झालेल्या वादात शिंदे यांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना घडली. या घटनेत दुचाकीस्वार अल्पवयीन असल्याचे समोर आल्याने बरेच प्रश्न उपस्थित झाले. मुळात १६ वर्षांवरील तरुणांना ५0 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी चालवण्याचा परवाना दिला जातो. तर १८ वर्षांवरील तरुणांना अन्य वाहन चालविण्याचा परवाना देण्यात येतो. शिंदे यांनी हटकलेल्या तरुणाचे वय हे १७ होते व तो अल्पवयीन होता आणि त्याच्याकडे परवाना नसल्याची बाबही उघड झाली. महत्त्वाची बाब म्हणजे विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांचे मुंबईत प्रमाण अधिक असून, त्याविरोधात वाहतूक पोलिसांनी कंबरही कसली आहे. तरीही त्यांचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. २0१२मध्ये ५,३२१ केसेसची नोंद वाहतूक पोलिसांकडे झाली होती. त्यानंतरच्या वर्षात हाच आकडा ६ हजार ३0१ एवढा झाला. २0१६च्या जुलै महिन्यापर्यंत तर ५ हजार ४८२ विनापरवाना चालकांची नोंद झाली आहे. यात अल्पवयीन चालकांचेही प्रमाण मोठे असल्याचे वाहतूक पोलीस सांगतात. शिंदे यांच्या घटनेची गंभीर दखल घेत आणखी कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)