Water Cut News: मुंबई आणि नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबईत शुक्रवारी (१८ जुलै २०२५) आणि मुंबईत शनिवारी (१९ जुलै २०२५) पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद राहणार आहे, त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले.
मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहनमुंबईतील टी वॉर्ड आणि मलबार हिल परिसरात शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून पुढील १२ तास पाणीपुरठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली. मुलुंड पश्चिम येथील वीणा नगरमधील योगी हिल रोडवरील ६०० मिलीमीटर वासाच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले. जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना नियमितपणे पाणीपुरवठा केला जाईल.
नवी मुबंईत १८ तास पाणीपुरवठा बंद राहणार!नवी मुंबईत शुक्रवारी सकाळी १०.०० ते शनिवारी पहाटे ०४.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. या कालावधीत नवी मुंबईच्या मोठ्या भागांना पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या १७०० मिमी व्यासाच्या मोरबे पाईपलाईनला नवीन पाईपलाईन जोडली जाणार आहे. परिणामी, नवी मुंबईतील ऐरोली, बेलापूर, नेरुळ, कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, घणसोली आणि वाशी भागांत पाणीपुरवठा बंद असेल.शनिवारी संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिकेने दिली. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या वापराचे योग्य नियोजन करण्याचे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.