शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

मुंबईत पावसाचं तांडव...! चेंबूर, विक्रोळीतील घटनेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं दुःख

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 12:36 PM

चेंबूर भागात मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळच्या सुमारास काही घरांवर दरड कोसळल्याची घठना घडली. यात 17 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. याशिवाय, विक्रोळी भागात एक इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू झला आहे.

नवी दिल्ली/मुंबई - मुंबई आणि उपनगरांत पावसाने कहर केला आहे. चेंबूर भागात मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळच्या सुमारास काही घरांवर दरड कोसळल्याची घठना घडली. यात 17 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. तर 16 जणांचे रेस्क्यू करण्यात आले आहे. याशिवाय, विक्रोळी भागात एक इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू झला आहे. यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही दुःख व्यक्त केले आहे.

या घटनेवर दुःख व्यक्त करताना राष्ट्रपती म्हणाले, "मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळीमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत काहींचा मृत्यू, तर काही जण जमी झाल्याचे ऐकूण अत्यंत दुःख झाले. शोकग्रस्त कुटुंबींयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसेच मदत आणि बचाव कार्य पूर्णपणे यशस्वी व्हावे यासाठी प्रार्थना करतो."

Mumbai Chembur Landslide: मुंबईत पावसाचा कहर; चेंबूरमध्ये दरड कोसळून 17 मृजणांचा मृत्यू; विक्रोळीत 5, तर भांडूपमध्येही एक दगावला

विक्रोळी भागात इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू - मुंबईमध्ये  सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे विक्रोळी भागातही एक इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. DCP (झोन 7)चे प्रशांत कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला तर 5 ते 6 लोक अडकल्याची शक्यता आहे. तसेच, भांडूप पंपिंग स्टेशनच्या भिंतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू आणि काही जण जखमी झाल्याचे समजते. तसेच, मुसळधार पावसाचा भांडुप पंपिंग स्टेशनच्या वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत काही भागांला पाणीपुरवठा होणार नाही, असे महापालिकेने कळवले आहे.

Mumbai Chembur Landslide: मुंबईत पावसाचा कहर; चेंबूर, विक्रोळीत 22 जणांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त करत मदतीची घोषणा 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदRainपाऊसMumbaiमुंबईChemburचेंबूरBuilding Collapseइमारत दुर्घटनाlandslidesभूस्खलन