मुंबईत पावसाचं तांडव...! चेंबूर, विक्रोळीतील घटनेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं दुःख

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 12:36 PM2021-07-18T12:36:59+5:302021-07-18T12:41:25+5:30

चेंबूर भागात मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळच्या सुमारास काही घरांवर दरड कोसळल्याची घठना घडली. यात 17 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. याशिवाय, विक्रोळी भागात एक इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू झला आहे.

Mumbai Rains: Landslide wall collapse in chembur President Ramnath Kovind expressed grief over the incident at Chembur, Vikhroli | मुंबईत पावसाचं तांडव...! चेंबूर, विक्रोळीतील घटनेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं दुःख

मुंबईत पावसाचं तांडव...! चेंबूर, विक्रोळीतील घटनेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं दुःख

Next


नवी दिल्ली/मुंबई - मुंबई आणि उपनगरांत पावसाने कहर केला आहे. चेंबूर भागात मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळच्या सुमारास काही घरांवर दरड कोसळल्याची घठना घडली. यात 17 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. तर 16 जणांचे रेस्क्यू करण्यात आले आहे. याशिवाय, विक्रोळी भागात एक इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू झला आहे. यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही दुःख व्यक्त केले आहे.

या घटनेवर दुःख व्यक्त करताना राष्ट्रपती म्हणाले, "मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळीमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत काहींचा मृत्यू, तर काही जण जमी झाल्याचे ऐकूण अत्यंत दुःख झाले. शोकग्रस्त कुटुंबींयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसेच मदत आणि बचाव कार्य पूर्णपणे यशस्वी व्हावे यासाठी प्रार्थना करतो."

Mumbai Chembur Landslide: मुंबईत पावसाचा कहर; चेंबूरमध्ये दरड कोसळून 17 मृजणांचा मृत्यू; विक्रोळीत 5, तर भांडूपमध्येही एक दगावला

विक्रोळी भागात इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू - 
मुंबईमध्ये  सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे विक्रोळी भागातही एक इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. DCP (झोन 7)चे प्रशांत कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला तर 5 ते 6 लोक अडकल्याची शक्यता आहे. तसेच, भांडूप पंपिंग स्टेशनच्या भिंतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू आणि काही जण जखमी झाल्याचे समजते. तसेच, मुसळधार पावसाचा भांडुप पंपिंग स्टेशनच्या वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत काही भागांला पाणीपुरवठा होणार नाही, असे महापालिकेने कळवले आहे.

Mumbai Chembur Landslide: मुंबईत पावसाचा कहर; चेंबूर, विक्रोळीत 22 जणांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त करत मदतीची घोषणा 

Web Title: Mumbai Rains: Landslide wall collapse in chembur President Ramnath Kovind expressed grief over the incident at Chembur, Vikhroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app