मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर अपघातामुळे वाहतुकीची कोंडी

By Admin | Updated: June 16, 2016 11:30 IST2016-06-16T08:13:04+5:302016-06-16T11:30:01+5:30

मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर ओडोशी बोगद्याजवळ चार गाड्यांचा विचित्र अपघात झाला असल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे

Mumbai-Pune Express-Wave road accident due to accident | मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर अपघातामुळे वाहतुकीची कोंडी

मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर अपघातामुळे वाहतुकीची कोंडी

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 16 - मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर सुरु असलेली अपघातांची मालिका अजूनही सुरु आहे. गुरुवारी सकाळी ओडोशी बोगद्याजवळ चार गाड्यांचा विचित्र अपघात झाला आहे. 2 कार, 2 ट्रक आणि एक कंटेनर एकमेकांवर आदळून हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. सकाळच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे एक्स्प्रेस-वेवर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे. मुंबईच्या दिशेने येणा-या वाहनांच्या 5 ते 6 किमी लांब रांगा लागल्या आहेत.
 
(महामार्गावरील अपघात टाळायचाय ? तर हे पाळा)
 
पावसाळ्यात दरड कोसळू नये यासाठी जाळी बसवण्याचं काम सुरु असल्याने एक लेन बंद ठेवण्यात आली आहे. तर अपघाताग्रस्त वाहनांना हटवण्याचे कामदेखील सुरु असल्याने वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरु आहे. 
 
 
 
 
 
 

Web Title: Mumbai-Pune Express-Wave road accident due to accident