पंतप्रधान मोदींना बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबई पोलिसांना मिळाला व्हाट्सअॅप मेसेज; उडाली खळबळ, तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 19:01 IST2024-12-07T18:58:52+5:302024-12-07T19:01:35+5:30
यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे की, "ज्या नंबरवरून हा मेसेज आला, त्याचा तपास आम्ही केला आहे. हा क्रमांक अजमेर राजस्थानचा असल्याचे आम्हाला समजले आहे. संशयिताला पकडण्यासाठी आमचे एक पथक तत्काळ राजस्थानला रवाना झाले आहे...

पंतप्रधान मोदींना बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबई पोलिसांना मिळाला व्हाट्सअॅप मेसेज; उडाली खळबळ, तपास सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी असणारा एक मेसेज शनिवारी मुंबई पोलिसांना मिळाला. मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर आलेल्या या मेसेजमध्ये, पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे (आयएसआय) दोन एजंट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉम्बने घडवण्याचा कट आखत असल्याचे, लिहिण्यात आले होते. हा मेसेज मिळताच मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.
यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे की, "ज्या नंबरवरून हा मेसेज आला, त्याचा तपास आम्ही केला आहे. हा क्रमांक अजमेर राजस्थानचा असल्याचे आम्हाला समजले आहे. संशयिताला पकडण्यासाठी आमचे एक पथक तत्काळ राजस्थानला रवाना झाले आहे.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आमच्या वाहतूक नियंत्रण पथकाच्या हेल्पलाइनवर हा धमकीचा मेसेज पहाटेच्या सुमारास मिळाला. या मेसेजमध्ये आयएसआयच्या दोन एजंटांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटासंदर्भात सांगण्यात आले आहे. या मेसेजनुसार, दोन एजंट पीएम मोदींना बॉम्बने उडवण्याचा कट आखत आहेत.
संबंधित अधिकाऱ्याने म्हटले आहे की, धमकी देणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ अथवा दारूच्या नशेत असावी, असा संशय तपासकर्त्यांना आहे. प्रकरणाचा तपास अद्यापही सुरूच आहे. तथापि, संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायिक संहितेच्या कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे महत्वाचे म्हणजे, यापूर्वीही मुंबई पोलिसांच्या हेल्पलाइनवर असे धमकीचे कॉल आणि मेसेज आले आहेत.
सलमान खानसंदर्भातही आले आहेत धमकीचे मेसेज -
मुंबई पोलिसांना गेल्या दहा दिवसांत अभिनेता सलमान खानला मारण्याचेही 2 मेसेज आले आहेत. नुकताच काल एक मेसेज आला होता, ज्यामध्ये सलमान खानला जिवंत राहायचे असेल तर त्याने बिष्णोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागावी आणि तेथे समाजासाठी 5 कोटी रुपये दान करावेत, असे म्हटले होते. जर त्याने असे केले नाही तर आम्ही त्याला लवकरच संपवू. विष्णोई गँग अजूनही अॅक्टिव्ह आहे.