शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्ग धोकादायक

By admin | Updated: May 14, 2015 02:11 IST

मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. सुकेळी येथे दोन सख्ख्या भावांचा अपघातात बळी गेल्याचे वृत्त ताजे असतानाच

रोहा : मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. सुकेळी येथे दोन सख्ख्या भावांचा अपघातात बळी गेल्याचे वृत्त ताजे असतानाच बुधवारी कोलाड जवळील बरसगावच्या हद्दीत स्वीफ्ट डिझायर कार भरधाव वेगाने जात विरूध्द दिशेने येणाऱ्या टँकरवर आदळली. या अपघातात एक प्रवासी ठार तर चार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.याबाबत कोलाड पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ६ वाजताच्या सुमारास दापोलीहून मुंबई बोरीवलीकडे जाणारी स्वीफ्ट डिझायर कार मुंबईहून येत असलेल्या टँकरवर जोरदार आदळल्याने झालेल्या अपघातात हर्षदा अरूण मेंगाणे, प्रियंका अरूण मेंमाणे, अरूण अर्जून मेंगाणे, अमिता अरूण मेंमाणे, मिलिंद राम शिवे (सर्व राहणार बोरिवली ) हे प्रवासी जखमी झाले आहेत. हे सर्व जण एकाच कुटुंबातील आहेत. जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी रोहे येथील शासकीय रु ग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे एकही डॉक्टरच उपलब्ध नसल्याने या जखमी प्रवाशांचे हाल झाले. म्हणून त्यांना पुढील उपचारार्थ पनवेलच्या एमजीएम हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. या अपघातात स्वीफ्ट डिझायर कार आपला मार्ग सोडून विरूध्द दिशेने येणाऱ्या टँकरवर आदळल्याने कारच्या पुढील भागाचे नुकसान झाले. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून अपघाताचे वृत्त समजताच कोलाड पोलीस स्टेशन, कोलाड वाहतूक शाखेने घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची अधिक चौकशी पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या राष्ट्रीय महामार्गावर दररोज घडणाऱ्या अपघातांमुळे सुरक्षितता धोक्यात आली असून महामार्गाच्या रूंदीकरणारचे काम कधी पूर्ण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या महामार्गावर दिवसेगणिक घडणारे अपघात पाहता निष्पाप नागरिकांना प्राणाला मुकावे लागत असल्याने सर्वत्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. (वार्ताहर)