शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
3
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
4
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
5
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
6
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
7
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
9
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
10
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
11
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
12
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
13
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
14
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
15
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
16
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
17
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
18
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
19
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
20
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन

Mumbai Drug Case: Sameer Wankhede यांना अडचणीत आणणाऱ्या Prabhakar Sailबाबत त्याच्या आईने केले धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाली तो गेल्या चार महिन्यांपासून संपर्कात नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 09:36 IST

Mumbai Drug Case: Prabhakar Sail याने धक्कादायक गौप्यस्फोट केले होते. त्यामुळे NCBचे विभागीय संचालक Sameer Wankhede हे अडचणीत आले आहेत. दरम्यान, याच प्रभाकर साईलबाबत त्याची आई हिरावती साईलने धक्कादायक दावे केले आहेत.

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या मुंबई ड्रग्स केसमध्ये किरण गोसावीचा बॉडिगार्ड प्रभाकर साईल याने धक्कादायक गौप्यस्फोट केले होते. त्यामुळे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे अडचणीत आले आहेत. दरम्यान, याच प्रभाकर साईलबाबत त्याची आई हिरावती साईलने धक्कादायक दावे केले आहेत. प्रभाकर हा गेल्या चार महिन्यांपासून आमच्या संपर्कात नाही. तसेच तो कुठे राहतो, याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, असे तिने म्हटले आहे.

या संदर्भातील वृत्त टीव्ही-९ मराठीने प्रसारित केले आहे. त्यात प्रभाकर साईलची आई हिरावती साईल हिने सांगितले की, ''प्रभाकरला मी काय सांगणार, तो कुठे राहतो ते आम्हाला काही माहिती नाही. गेल्या चार महिन्यांपासून त्याने आमच्याशी संपर्कही साधलेला नाही. आमच्याशी बोललेला नाही. तसेच त्याने आमची विचारपुसही केलेली नाही. तसे कधी त्याने आम्हाला पाच पैसे दिलेलेही नाहीत. त्याचं आमच्याशी काही देणंघेणं नाही. इथे घरात असलेले कपडेलत्ते तो घेऊन गेलाय, आता आमच्या इथे त्याचं काहीही नाही''.काल प्रभाकर साईल या किरण गोसावीच्या बॉडीगार्डने केलेल्या धक्कादायक गौप्यस्फोटांमुळे खळबळ उडाली होती. आर्यन खान प्रकरणामध्ये २५ कोटींची डिल ठरली होती. त्यामधील ८ कोटी रुपये समीर वानखेडे यांना देण्याचे ठरले होते. तसेच कोऱ्या कागदावर आपल्या सह्या घेण्यात आल्या होत्या, असा दावा प्रभाकर साईलने केला होता. 

तो बॉडीगार्ड म्हणून काम करतो. त्याने रविवारी जे काही गौप्यस्फोट केले त्याबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. आज दुपारी त्याबाबत आम्हाला कळलं. सध्या तो कुठे आहे, काय करत आहे याबाबत आम्हाला काही माहिती नाही, असे प्रभाकर साईलची आई हिरावती साईल हिने सांगितले.तसेच आपण मुळचे कोकणातील असून, अनेक वर्षांपासून मुंबईतच वास्तव्यास आहोत. प्रभाकरचा विवाह झाला असून, त्याला दोन मुली आहे. मात्र त्याची पत्नी त्याच्या मुलींसह माहेरी राहते, अशी माहिती प्रभाकरच्या आईने दिली.

कोण आहे प्रभाकर साईल प्रभाकर साईल हा किरण गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. किरण गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. २५ कोटींचा बॉम्ब टाका. १८ कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं आणि ऐकल्याचं साईल यांचा दावा आहे.प्रभाकर राघोजी साईल (४०) हे अंधेरी पूर्वेकडे राहतो. ते किरण प्रकाश गोसावी याचे बॉडीगार्ड आहे. २२ जुलै २०२१ पासून गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून तो काम करत आहे. ३० जुलै २०२१ रोजी तो गोसावीच्या ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये पहिल्यांदाच गेला होता. त्यावेळी इम्पोर्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय असल्याचं गोसावीने त्यांना सांगितलं होतं. नंतर गोसावीने साईलची बॉडीगॉर्ड म्हणून नेमणूक केली होती. 

टॅग्स :Mumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीSameer Wankhedeसमीर वानखेडेCrime Newsगुन्हेगारी