शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

आता तयारीला लागा...एमपीएससीच्या परीक्षा मार्चमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 10:46 IST

आज तारखांसदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.कोणताही उमेदवार अपात्र ठरू देणार नाही, मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं आश्वासन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल वर्षभरापासून रखडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आता मार्चमध्ये होणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं याबाबत निर्णय घेतला असून आज परीक्षांच्या तारखांबद्दल आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा या मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तर अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा तिसऱ्या आठवड्यात घेतल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या परीक्षांना विलंब झाला आहे. या परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी या परीक्षा कधी जाहीर होणार याच्या प्रतीक्षेत होते. तसंच लवकरात लवकर या परीक्षा पार पाडल्या जाव्या अशी मागणीही करण्यात येत होते. दरम्यान, आता मार्च महिन्यात या परीक्षा पार पडणार असल्याचं समोर आलं आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्य सेवा पूर्व परीक्षा तर तिसऱ्या आठवडय़ात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा एप्रिल महिन्यात होणार असल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात आलं. आज या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या स्थगितीनंतर एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ठाकरे सरकारनं या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. तसंच परीक्षांची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचंही त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaratha Reservationमराठा आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय