शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

...म्हणून भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज ठाकरेंना लिहिलं खास पत्र, केलं अभिनंदन!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 7:44 PM

खासदार गोपाळ शेट्टी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते रविवारपासूनच बोरिवलीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शेट्टी यांनी स्वतःच लोकमतला फोन करून या पत्रासंदर्भात माहिती दिली आहे.

 मुंबई - कोकणातील बहुचर्चित नाणार प्रकल्पाला समर्थन दिल्याबद्दल उत्तर मुंबईचे भाजप (BJP) खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे खास पत्र लिहून अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी, विकासासाठी आणि हितासाठी नाणार प्रकल्पासंदर्भात आपण मांडलेली भूमिका रास्त आहे, असे शेट्टी यांनी म्हटले आहे. (MP Gopal Shetty congratulated Raj Thackeray for supporting the Nanar project in Ratnagiri )...अन् उद्धव ठाकरेंना लेटरबाजी करण्याचा प्लॅन शिजला; नाणार विरोधकांचा राज ठाकरेंवर आरोप

खासदार गोपाळ शेट्टी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते रविवारपासूनच बोरिवलीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शेट्टी यांनी स्वतःच लोकमतला फोन करून या पत्रासंदर्भात माहिती दिली. यावेळी, रत्नागिरी राजापूरची रिफायनरी  चालू करून नाणार प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राबद्धलही शेट्टी यांनी राज ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे.

कोरोना काळात देशत अनेकांना बेरोजगारीला तोंड द्यावे लागत आहे. त्यात अमर्याद स्वयंरोजगाराच्या संधी देणारा हा प्रकल्प सुरू करण्यात आला, तर नवीन पिढीसाठी रोजगार निर्मितीची मोठी पार्श्वभूमी तयार होणार आहे. असेही शेट्टी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

राज ठाकरेंची 'मन की बात' मुख्यमंत्री ऐकणार? मनसेप्रमुखांनी थेट शरद पवारांना फोन केला अन्...

याच बरोबर, 3 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा नाणार प्रकल्प नाकारणे योग्य ठरणार नाही. यासंदर्भातील वाद सुरुवातीपासूनच चिघळलेला आहे. पण 2000 कोंकणवासियांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात, या प्रकल्पात स्थानिक कोंकणी माणसांच्या रोजगारला प्राधान्य देण्याची तजवीज केली आहे. उद्योग निर्मितीची मोठी संधी प्रामुख्याने कोकणातील तरुणांना दिली तर एकूण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी हे हिताचे ठरेल, असे मतही शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले. एकेकाळी संगणक आले की बेरोजगारी वाढत जाईल, अशी भीती बाळगली जात होती. पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, हे संगणका मार्फत "डिजिटल इंडिया"मुळे जागतिक पातळीवर पोहचले, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. याच बरोबर मारुती सुझुकीला एकेकाळी विरोध झाला आणि नंतर त्या उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली, याकडेही खासदार शेट्टी यांनी राज ठाकरेंचे लक्ष वेधले.

राज ठाकरेंच्या मातोश्री आणि बहिणीने घेतली कोरोनाची लस; शर्मिला ठाकरेंचीही उपस्थिती

एखादा मोठा प्रकल्प किंवा बदल घडणार असेल तर त्याला विरोध होणे, हे साहजिकच आले. पण नाणार प्रकल्पामुळे कोंकणबरोबरच देशात बदल घडत असेल तर या प्रकल्पाचा तज्ञ व्यक्तींच्या मदतीने फेरविचार करावा लागेल. मात्र, फक्त संघर्षामुळे विकासाच्या वाटा बंद होऊन तमाम जनतेचे हित लांबवले जात आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेGopal Shettyगोपाळ शेट्टीBJPभाजपाMNSमनसे