शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

चळवळीचा ‘पँथर’ हरपला

By admin | Updated: May 25, 2017 02:50 IST

कुटुंबापेक्षा पँथर चळवळीवर अधिक प्रेम करणारा, झोपडपट्टीतील नागरिकांच्या हक्कांसाठी लढणारा, दलित अत्याचारांच्या विरोधात आवाज उठविणारा

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कुटुंबापेक्षा पँथर चळवळीवर अधिक प्रेम करणारा, झोपडपट्टीतील नागरिकांच्या हक्कांसाठी लढणारा, दलित अत्याचारांच्या विरोधात आवाज उठविणारा, सर्व राजकीय पक्षांचे नेते-कार्यकर्त्यांबरोबर सलोख्याचे संबंध असणारा, अत्यंत सयमी व शांत कार्यकर्ता म्हणून नवनाथ कांबळे यांचा नावलौकिक होता. कांबळे यांच्या अशा अचानक जाण्याने दलित चळवळीचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले भावनिक झाले. उपमहापौर नवनाथ कांबळे यांना श्रद्धांजली अपर्ण करण्यासाठी बुधवारी बालगंर्धव रंगमंदिरात सर्व राजकीय पक्षांच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, अंकुश काकडे, आमदार माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, किरण मोघे, अविनाश बागवे, एम. डी. शेवाळे, वासुदेव गाडे, शरद रणपिसे, अभय छाजेड, परशुराम वाडेकर, महेंद्र कांबळे, महिपाल वाघमारे यांच्यासह नगरसेवक, सर्वच राजकीय पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अनेक प्रमुख नेत्यांनी कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण केली.दिलीप कांबळे म्हणाले, की राज्यात ७२मध्ये पडलेल्या दुष्काळात आम्ही दोन्ही कुटुंबे पुण्यात स्थंलातरित झालो. झोपडपट्टीत, तळागळात काम करीत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेले नवनाथ कांबळे यांना उपमहापौरपद मिळाल्यानतंर खऱ्या अर्थाने आपल्या लोकांसाठी काम करण्याची सधी मिळाली होती. आपल्या बांधवांच्या विकासासाठी अनेक योजना त्यांच्या डोक्यात होत्या. या योजना आता आपण सर्वांनी मिळून पुढे नेल्या तर त्यांना श्रद्धांजली वाहिल्यासारखे होईल. दोन महिने अनेक कार्यक्रम, बैठकांमध्ये माझा सहकारी म्हणून काम केलेला एक तरुण कार्यकर्ता आज आपल्यात नाही, याचे खूप दु:ख होते. नवनाथ कांबळे यांच्या स्मारकासाठी आवश्यक असलेली सर्व मदत महापालिकेच्या वतीने करण्यात येईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.या वेळी सर्व आमदार, वासुदेव गाडे, किरण मोघे, काही नगरसेवक, महाविद्यालयामधील मित्र यांनी कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण केली.