आई, मुलगा पाण्यात वाहून गेले; रात्रभर शोधकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 05:10 AM2021-07-12T05:10:00+5:302021-07-12T05:10:35+5:30

चालकाला ओढ्यातील पाण्याचा अंदाज न आल्यानं आई, मुलगा पाण्यात वाहून गेल्याची घडली घटना.

Mother son drowned into the water The search continued overnight | आई, मुलगा पाण्यात वाहून गेले; रात्रभर शोधकार्य सुरू

आई, मुलगा पाण्यात वाहून गेले; रात्रभर शोधकार्य सुरू

Next
ठळक मुद्देचालकाला ओढ्यातील पाण्याचा अंदाज न आल्यानं आई, मुलगा पाण्यात वाहून गेल्याची घडली घटना.

औंढा नागगनाथ: तालूक्यातील कोंडसी (असोला) येथील ओढ्यातील पाण्याचा अंदाज चालकाला न आल्याने आई व मुलगा पाण्यात वाहून गेल्याची घटना रविवारी रात्री साडेआठ ते  नऊ वाजेच्या दरम्यान घडली.

औंढा नागनाथ तालुक्यातील शेळके (पोटा ) येथे रामदास शेळके, वर्षा योगेश पडोळ, योगेश पडोळ व त्यांचा मुलगा श्रेयस हे चार जण कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रम आटोपून ते कोंडसी (असोला) मार्गे औरंगाबादला निघाले. यावेळी चालकाला (योगेश) ओढ्याला आलेल्या पाण्याचा आंदाज आला नाही. या दरम्यान वर्षा पडोळ, श्रेयस पडोळ हा सात वर्षाचा मुलगा पाण्यात वाहून गेले. रामदास शेळके चालक योगेश यातून बाहेर आले.

दरम्यान, तहसीलदार कृष्णा कानगुले, सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे वाहून गेलेल्या आई आणि सात वर्षाच्या मुलाचा शोध घेत आहेत रात्री उशीरापर्यत हे शोधकार्य सुरूच होते.

Web Title: Mother son drowned into the water The search continued overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.