शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

शहरांमध्ये गरिबांसाठी अधिक घरे

By admin | Updated: February 10, 2015 02:29 IST

मुंबईसह राज्यातील सर्व शहरांमध्ये यापुढे मोठ्या खासगी भूखंडांवर बांधल्या जाणाऱ्या गृहसंकुलांमध्ये २० टक्के घरे परवडणा-या

मुंबई : मुंबईसह राज्यातील सर्व शहरांमध्ये यापुढे मोठ्या खासगी भूखंडांवर बांधल्या जाणाऱ्या गृहसंकुलांमध्ये २० टक्के घरे परवडणा-या किमतीची बांधण्याची राज्य सरकारने केलेली सक्ती झुगारून देण्याचा बिल्डर मंडळींनी केलेला प्रयत्न उच्च न्यायालयाने हाणून पाडल्याने ‘म्हाडा’च्या माध्यमातून गरिबांसाठी अधिक घरे उपलब्ध होणार आहेत.चार हजार चौ. मीटर किंवा त्याहून अधिक आकाराच्या खासगी भूखंडांवर निवासी संकुले बांधताना एकूण भूखंडाच्या २० टक्के क्षेत्रफळाएवढे भूखंड किंवा तयार बांधकामातील २० टक्के घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अथवा अल्प उत्पन्न गटासाठी राखून ठेवण्याची अधिसूचना आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी काढली होती. या अधिसूचनेने मुंबई आणि इतर शहरांच्या विद्यमान विकास नियंत्रण नियमावलीमध्ये (डीसी रुल्स) बांधकाम आराखड्याच्या मंजुरीसाठी ही पूर्वअट म्हणून समाविष्ट केली गेली. डी.बी. रिअ‍ॅलिटी आणि ओबेरॉय कन्स्ट्रक्शन्स यांच्यासारख्या मोठ्या बांधकाम कंपन्यांसह अर्धा डझन बिल्डर्स आणि जमीनमालकांनी या अधिसूचनेच्या घटनात्मक वैधतेस आव्हान दिले होते. मुख्य न्यायाधीश न्या. मोहित शहा व न्या. एम. एस. शंकलेशा यांच्या खंडपीठाने गेल्या आठवड्यात या सर्व याचिका फेटाळल्या. सर्वसमावेशक गृहनिर्माण धोरणाचा भाग म्हणून अशी सक्ती करण्याचा सरकारला अधिकार आहे आणि असे करण्यात काहीच घटनाबाह्य नाही, असा निर्वाळा न्यायालयाने दिला.मुंबईत सक्ती शिथिल 

गरिबांच्या घरांसाठी ही सक्ती सरकारने जेवढ्या नेटाने केली तेवढ्याच लगबगीने मुंबईपुरती ही सक्ती अनेक बाबतीत शिथिल करण्याची तत्परताही सरकारने दाखविली. ‘म्हाडा’तर्फे विकसित केले जाणारे भूखंड (डीसी रेग्युलेशन कलम ३३(५)), मोडकळीस आलेल्या इमारतींची पुनर्बांधणी (३३(७)), नागरी पुनरुथ्थान योजनेखाली केला जाणारा पुनर्विकास (३३(९), झोपडपट्टी पुनर्विकास (३३(१०) आणि संक्रमण शिबिरांचे बांधकाम यांना ही २० टक्क्यांची सक्ती लागू न करण्याचा सरकारचा इरादा आहे. तशी दुरुस्ती करण्याची अधिसूचना १४ सप्टेंबर रोजी काढण्यात आली व त्यावर जनतेच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या. तसेच पालिकेच्या एका प्रभागाऐवजी दुसऱ्या प्रभागातील इमारतींमध्ये अशी घरे देण्याची मुभाही बिल्डरना दिली जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी)