शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनला एल- निनोचा धोका

By admin | Updated: May 14, 2015 01:52 IST

भारतीय उपखंडातील मान्सूनवर यंदा ‘एल निनो’चा परिणाम जाणवणार असल्याचे भाकित आॅस्ट्रेलिया आणि जपानच्या हवामान विभागांनी केले आहे.

पुणे : भारतीय उपखंडातील मान्सूनवर यंदा ‘एल निनो’चा परिणाम जाणवणार असल्याचे भाकित आॅस्ट्रेलिया आणि जपानच्या हवामान विभागांनी केले आहे. परिणामी जून, जुलैमध्ये पाऊसमान कमी झाले तरी आॅगस्ट, सप्टेंबर किमान तूट भरून निघते, असे गेल्या १०० वर्षांत केलेल्या एल निनोच्या अभ्यासावरून दिसून आले आहे, असे भारतीय हवामान विभागातील शास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी आणि डॉ़ डी़ आऱ कोठावळे यांनी संशोधनात्मक प्रबंधातून दाखवून दिले आहे. आॅस्ट्रेलिया आणि जपानच्या हवामान विभागांनी एकूणच एल-निनोचा परिणाम जाणवेल, असा अंदाज वर्तविला आहे. जपान हवामान विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, एल-निनोचा अभ्यास करणाऱ्या मॉडेलनुसार मध्यम ते तीव्र स्वरुपाचा परिणाम जाणवणार असल्याचे म्हटले आहे. दक्षिण आॅस्ट्रेलियामध्ये या एल-निनो इफेक्टमुळे दुष्काळाची भीती आहे, तर भारतीय उपखंडातील मान्सूनवर त्याचा विपरित परिणाम होणार असल्याचे म्हटले आहे. भारतीय हवामान विभागाने यंदा एल निनोचा मान्सूनवर परिणाम होऊन सरासरीच्या ९१ टक्के पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे़एल निनोच्या परिणामासंदर्भात सादर केलेल्या प्रबंधाविषयी डॉ़ कुलकर्णी म्हणाले, गेल्या १०० वर्षांत पडलेल्या पावसाचा अभ्यास करताना त्यातील २० वर्षे एल निनोचा परिणाम मान्सूनवर झाल्याचे दिसून आले़ पॅसिफिक, हिंदी महासागर आणि अ‍ॅटलॅटिक महासागरातील तापमान हे दोन घटकही महत्वाचे ठरतात़ येथील वातावरण मान्सूनला अनुकूल असेल तर एल-निनोचा जास्त परिणाम मान्सूनवर होत नाही़ गेल्या वर्षी हे दोन्ही घटक प्रतिकूल होते़ त्यामुळे देशभरात सरासरीच्या १३ टक्के कमी पाऊस झाला़ गेल्या वर्षी जूनमध्ये सरासरीच्या ३३ टक्के कमी पाऊस झाला होता़ जुलैमध्ये हे प्रमाण आणखी वाढले़ ही तूट पावसाने आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये काही प्रमाणात भरून काढली़, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.