शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

मोनोरेल लटकली!

By admin | Updated: March 16, 2015 04:08 IST

रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाल्याने वडाळा-चेंबूर मार्गावर धावणारी मोनोरेल भक्ती पार्क स्थानकाजवळ चक्क बंद पडण्याची घटना घडली.

मुंबई : रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाल्याने वडाळा-चेंबूर मार्गावर धावणारी मोनोरेल भक्ती पार्क स्थानकाजवळ चक्क बंद पडण्याची घटना घडली. सुदैवाने घटनास्थळी तत्काळ दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी उंच शिडीच्या मदतीने मोनोमधील १० प्रवासी आणि कॅप्टनला सुमारे अडीच तासांनंतर साडेदहाच्या सुमारास सुखरूप बाहेर काढले. या घटनेनंतर मोनोरेल तब्बल चार तास खोळंबली होती. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ती रुळावर नियमित धावू लागली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे चेंबूर-वडाळा-महालक्ष्मी या मोनोरेल मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. या मार्गावरील वडाळा ते चेंबूर हा मार्ग वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आला असून, चेंबूर ते महालक्ष्मी या मोनोरेल मार्गाचे काम सुरू आहे. वडाळा ते चेंबूर हा मोनोरेल मार्ग सुरू होऊन वर्ष उलटून गेले तरी या मोनोरेलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी आहे. (प्रतिनिधी)