रुपीवर दिवाळखोरीचे सावट

By Admin | Updated: June 29, 2014 01:31 IST2014-06-29T01:31:19+5:302014-06-29T01:31:19+5:30

रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेची वाटचाल आता दिवाळखोरीकडे सुरू झाली आहे. रिझव्र्ह बँकेने (आरबीआय) रूपी बँकेला कारणो दाखवा नोटीस बजावली

Money on bankruptcy | रुपीवर दिवाळखोरीचे सावट

रुपीवर दिवाळखोरीचे सावट

>पुणो : रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेची वाटचाल आता दिवाळखोरीकडे सुरू झाली आहे. रिझव्र्ह बँकेने (आरबीआय) रूपी बँकेला कारणो दाखवा नोटीस बजावली असून, त्यात तुमचा परवाना रद्द का करू नये, अशी विचारणा केली आहे. या नोटिशीची मुदत 2 जुलै रोजी संपत आहे. तसेच या निर्णयामुळे बँकेच्या सुमारे साडेसात लाख ठेवीदार, खातेदार, सभासदांचे भवितव्य देखील टांगणीला लागले आहे. आरबीआयने परवाना रद्दची कारवाई केल्यास सहकार विभागाला मोठा हादरा बसणार आहे. 
आरबीआयने दोन जून रोजी बँकेला कारणो दाखवा नोटीस बजावली आहे. त्यात 2क्क्2 पूर्वीच्या कजर्प्रकरणातील वसुलीबाबत विचारणा करण्यात आल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रंनी दिली. तसेच बँकेचा परवाना रद्द का करू नये अशी विचारणा देखील त्यात करण्यात आली आहे. या नोटिशीची मुदत 2 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे बँकेच्या भवितव्याचा निर्णय आरबीआयच्या हाती आहे.  बँकेचा परवाना रद्द झाल्यास बँक दिवाळखोरीत निघेल. (प्रतिनिधी)  

Web Title: Money on bankruptcy