शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

मोदी लाटेत राष्ट्रवादी बचावली, काँग्रेस बुडाली!

By admin | Updated: May 17, 2014 03:55 IST

देशभरात नरेंद्र मोदी यांच्या लाटेत अनेक पक्ष आणि नेते बुडाले असले, तरी दक्षिण महाराष्ट्रातील लढविलेल्या तिन्ही जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस बचावली आहे.

देशभरात नरेंद्र मोदी यांच्या लाटेत अनेक पक्ष आणि नेते बुडाले असले, तरी दक्षिण महाराष्ट्रातील लढविलेल्या तिन्ही जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस बचावली आहे. याच वेळी तिन्ही जागा गमावून आघाडीतील मित्र पक्ष असलेली काँग्रेस मात्र या लाटेत बुडाली आहे. दक्षिण महाराष्ट्र हा गेली सहा दशके काँग्रेस आणि मित्र पक्षांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या विभागात काँग्रेसचा पराभव म्हणजे दिवास्वप्नच असायचे. पण या वेळी त्यांना धक्का बसला. सोलापुरातून केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे दोन नंबरचे नेते सुशीलकुमार शिंदे, सांगलीतून केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील आणि इचलकरंजीतून माजी मंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविली. ते तिघेही पराभूत झाले. कोल्हापुरातून धनंजय महाडिक, सातार्‍यातून छत्रपती उदयनराजे आणि माढ्यातून विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून विजयी लढत दिली. या सहा जागांपैकी हातकणंगलेच्या जागेवर शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी विद्यमान खासदार होते. माढ्यात तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रतिनिधित्व करीत होते. कॉँग्रेस -राष्टÑवादीच्या या आघाडीविरुद्ध मोदी लाटेचा अचूक लाभ घेत महायुतीने काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार घेत मोठे यश मिळविले.