शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

Master Stroke to Master mind हा प्रवास थक्क करणारा आहे; मनसेचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 10:29 AM

Sachin Vaze Letter: भाजपसह मनसे आणि अन्य पक्षांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

ठळक मुद्देमनसेकडून ठाकरे सरकारवर टीकाअनिल परब यांच्यावर साधला निशाणाMaster Stroke to Master mind हा प्रवास थक्क करणारा आहे - देशपांडे

मुंबई: मनसुख हिरेन हत्याप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंची (Sachin Vaze) NIA कडून चौकशी सुरू आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) आपल्याकडे २ कोटींची मागणी केली होती. तसेच राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी कायदा भंग करणाऱ्या कंत्राटदारांकडून ५० कोटींची वसुली करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक दावा सचिन वाझेंनी आपल्या पत्रात (Sachin Vaze Letter) केला आहे. यावरून भाजपसह मनसे आणि अन्य पक्षांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मास्टर स्ट्रोक ते मास्टर माइंड हा प्रवास थक्क करणारा आहे, असा खोचक टोला मनसेकडून लगावण्यात आला आहे. (sandeep deshpande criticised anil parab over sachin vaze letter)

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करत अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. Master Stroke to Master mind हा प्रवास थक्क करणारा आहे" Advocate"साहेब शपथेवर खोट बोलणं हा गुन्हा आहे हे आपल्याला माहित असेल ही अपेक्षा, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे. यापूर्वीही संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडले होते. 

वकील साहब की तो कल लग गयी

ओ परिवार मंत्री.. शपथ काय घेता.. शेंबूड पुसा.. राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा.. पुरावे तयार आहेत.. आता वस्त्रहरण अटळ आहे, असा हल्लाबोल करत मी विचार करत होतो… मला शहरातली सर्वांत एलिजिबल आणि उच्चशिक्षित बॅचलरकडून अजूनही मानहानीची नोटीस येणार का? आतुरतेने वाट पाहतोय. वकील साहेबांची तर काल लागली… आता नोटीस कोण बनवणार?, अशी खोचक विचारणा नितेश राणे यांनी ट्विटवरून केली आहे. 

Sachin Vaze Letter: “ओ परिवार मंत्री... शपथ काय घेता, राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा”

दरम्यान, अनिल परब यांनी सचिन वाझे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे नेते दोन तीन दिवस आरडा ओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. मी कधीही वाझेंना अशा प्रकारच्या वसुलीचे आदेश दिले नव्हते, असे अनिल परब यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेAnil Parabअनिल परबAnil Deshmukhअनिल देशमुखSandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसेPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना