शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे ‘इंजिन’ लागले धक्क्याला!

By admin | Updated: November 3, 2015 02:34 IST

लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ महापालिका निवडणुकीत दारुण पराभव करून, मतदारांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात, मनसेचे इंजिन जणू कायमचे धक्क्याला लावले.

- गौरीशंकर घाळे (विश्लेषण)लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ महापालिका निवडणुकीत दारुण पराभव करून, मतदारांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात, मनसेचे इंजिन जणू कायमचे धक्क्याला लावले.कल्याण-डोंबिवलीत मागील निवडणुकीत मनसेला २७ जागांवर विजय मिळाला होता. या वेळी केवळ ९ जागाच मनसेला राखता आल्या. प्रभागरचना बदलल्याने फटका बसला, असा दावा मनसेकडून करण्यात येत आहे. मात्र, २७ नगरसेवकांचे काम इतके मर्यादित होते की, फेररचनेनंतर त्यांच्या तोंडाला अक्षरश: फेस आला. शिवाय, कुंभमेळ्याच्या निमित्ताने शासनाने नाशकात केलेल्या कामाची टेप त्यांनी स्वत:च्या नावाने जोरदार वाजविली, पण मतदारांनी त्यांचा हा बनाव पुरता उघडा पाडला. फक्त भाषणबाजीवर निवडणुका जिंकता येत नाहीत. पक्ष नेतृत्वाची विश्वासार्हता संपली की नेमके काय होते, त्याचाच प्रत्यय या निकालांनी आला. लोकसभा, विधानसभा आणि आता महापालिकेत मनसेचा सारा प्रचार केवळ राज ठाकरेंच्या मोठ्या सभा व भाषणांभोवतीच घुटमळला. त्यातही ‘संपूर्ण सत्ता द्या, मग बघा कसा बदल घडवितो, सगळ्यांना सुतासारखा सरळ करतो,’ या शाब्दिक फटाक्यांपुढे राज ठाकरेंकडेही काही नव्हते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे केवळ आराखडा मांडतात. खरेतर या आराखड्यातील अनेक कामे आमदार, नगरसेवकांच्या निधीतूनही करता आली असती. विरोधी बाकांवर बसणाऱ्यांनाही निधी मिळतो आणि त्यातून किमान स्वत:च्या मतदारसंघात, प्रभागात विकासकामे करतात आली असती. याकडे मनसे नेत्यांनी सोईस्कर दुर्लक्ष केले असले, तरी मतदारांनी मात्र याची गंभीर नोंद घेत मनसेला चपराक लगावली, पण आपल्याच ‘कोषा’त वावरणाऱ्या बेफिकीर मनसे नेतृत्वाला त्याची तमाच नाही. आता मैदानात उतरून घाम गाळल्याशिवाय, मुंबई-नाशकात मनसेचे इंजिन धावण्याची सुतराम शक्यता नाही, इतके मात्र कल्याण-डोंबिवलीने ठळकपणे अधोरेखित केले आहे.