शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

Raj Thackeray: 'हिंदूजननायक' उपाधीवर राज ठाकरेंनी हातच जोडले, जरा चिडूनच म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 12:36 PM

हिंदूहृदयसम्राट पाठोपाठ 'हिंदूजननायक' उपाधीलाही राज ठाकरेंचा आक्षेप

औरंगाबाद: मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्याच्या निमित्तानं संपूर्ण शहरात त्यांच्या स्वागताचे पोस्टर लावण्यात आले आहेत. त्यावर राज यांच्या नावासमोर 'हिंदूजननायक' असा उल्लेख आहे. या उपाधीबद्दल प्रश्न विचारताच राज ठाकरे काहीसे संतापलेले दिसले. मी तसं काही मानत नाही, हे स्पष्ट करताना त्यांनी हिंदूहृदयसम्राट उपाधी लावण्यात आली, त्यावेळी दिलेल्या सूचनेचा संदर्भ दिला. राज यांनी आज सकाळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. हिंदूजननायक राज ठाकरे यांचं औरंगाबादमध्ये हार्दिक स्वागत, असा मजकूर असलेले बॅनर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरात लावण्यात आले आहेत. त्याबद्दल राज यांना प्रश्न विचारताच त्यांनी थेट हात जोडले. 'मी असं काही मानत नाही. याआधी माझ्या नावापुढे हिंदूहृदयसम्राटअशी उपाधी लावण्यात आली होती. त्यावेळीही मी असं काही करू नये अशी ताकीद दिली होती,' याची आठवण राज यांनी करुन दिली. माझ्या परवाच्या मोर्चावेळी एका चॅनलनेच हिंदू जननायक लिहिलं होतं. त्यांना विचारून बघा, असं राज ठाकरे पुढे म्हणाले. पत्रकारांशी संवाद साधताना राज यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याबद्दलही भाष्य केलं. मी फक्त झेंडा बदललाय, अजेंडा नाही. माझी भूमिका बदललेली नाही, असं मनसेप्रमुख राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. मराठीला नख लावण्याचा प्रयत्न केल्यास मी मराठी म्हणून अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला हात लावल्यास हिंदू म्हणून अंगावर जाईन, या भूमिकेचा पुनरुच्चार त्यांनी केला. सध्या शहरात लावण्यात आलेल्या मनसेच्या पोस्टर्सवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. त्यावर नाव बदलल्यास हरकत काय, असा प्रश्न विचारत राज यांनी नामांतराचा मुद्दा उपस्थित केला. चांगले बदल व्हायला हवेत, असं राज यांनी या विषयावर भाष्य करताना म्हटलं. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे