शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

MNS Chief Raj Thackeray: राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, कारण काय? पुण्यातील सभेत सविस्तर बोलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 10:30 IST

MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे.

MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु प्रकृती अस्वस्थामुळे राज ठाकरेंचा दौरा काही काळासाठी स्थगित केला गेल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. पायाच्या दुखण्यानं पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळे डॉक्टरांचा सल्ल्यानुसार त्यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या ट्विटर हँडलवर अयोध्या दौरा स्थगित केल्याची माहिती दिली आहे. यात त्यांनी अयोध्या दौरा स्थगित केला असून रविवारी पुण्यात होणाऱ्या सभेत याबाबत सविस्तर बोलू असं म्हटलं आहे. 

ठरलं! राज ठाकरे यांची तोफ आता पुण्यात धडाडणार; अखेर रविवारी सभा निश्चित

राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर मनसैनिकांनी जय्यत तयारीला सुरुवात केली होती. पण उत्तर प्रदेशातून राज यांच्या दौऱ्याला कडाडून विरोध करण्यात आला. भाजपाचे खासदार बृजभूषण चरण सिंह यांनी राज ठाकरेंनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी त्यानंतरच अयोध्येला यावं अशी मागणी केली. बृजभूषण सिंह यांनी याच पार्श्वभूमीवर मोठं शक्तीप्रदर्शन देखील केलं. तसंच ५ जून रोजी अयोध्येत राज ठाकरेंना येऊ देणार नाही. त्यासाठी ५ लाख लोक राज ठाकरेंना अडवतील असं म्हणत बृजभूषण सिंह यांनी शड्डू ठोकला आहे. त्यानंतर राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर ठाम होते. 

पुण्यात २२ मे रोजी सभा होणारपुण्यात २१ मे रोजी नदीपात्रात होणारी मनसेची जाहीर सभा देखील पावसाच्या शक्यतेमुळे रद्द करण्यात आली होती. पण आता ही सभा २२ मे रोजी सकाळी १० वाजता गणेश कला मंच येथे होणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे. नदीपात्रात जाहीर सभा घेण्याचं आम्ही ठरवलं होतं. पण हवामान खात्यानं त्यादिवशी पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि कार्यक्रत्यांना चिखलात बसवणं योग्य ठरणार नाही. तसंच मंडप वगैरे गोष्टींना देखील काही मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे ही सभा बंद सभागृहात घेण्याचं आम्ही ठरवलं. त्यात पुण्यात सर्वात मोठं सभागृह म्हणजे गणेश कला मंच हेच एक आहे. त्यामुळे या ठिकाणी सभा होईल आणि बाहेर स्क्रिन लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरुन कार्यकर्त्यांना सभा पाहता येईल, असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. याच सभेत आता राज ठाकरे अयोध्या दौरा स्थगित का केला याची माहिती देणार आहेत.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAyodhyaअयोध्या