MNS Chief Raj Thackeray: राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, कारण काय? पुण्यातील सभेत सविस्तर बोलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 09:56 AM2022-05-20T09:56:43+5:302022-05-20T10:30:00+5:30

MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे.

MNS Chief Raj Thackeray visit likely to postponed Ayodhya tour due to health reason | MNS Chief Raj Thackeray: राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, कारण काय? पुण्यातील सभेत सविस्तर बोलणार

MNS Chief Raj Thackeray: राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, कारण काय? पुण्यातील सभेत सविस्तर बोलणार

googlenewsNext

MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु प्रकृती अस्वस्थामुळे राज ठाकरेंचा दौरा काही काळासाठी स्थगित केला गेल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. पायाच्या दुखण्यानं पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळे डॉक्टरांचा सल्ल्यानुसार त्यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या ट्विटर हँडलवर अयोध्या दौरा स्थगित केल्याची माहिती दिली आहे. यात त्यांनी अयोध्या दौरा स्थगित केला असून रविवारी पुण्यात होणाऱ्या सभेत याबाबत सविस्तर बोलू असं म्हटलं आहे. 

ठरलं! राज ठाकरे यांची तोफ आता पुण्यात धडाडणार; अखेर रविवारी सभा निश्चित

राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर मनसैनिकांनी जय्यत तयारीला सुरुवात केली होती. पण उत्तर प्रदेशातून राज यांच्या दौऱ्याला कडाडून विरोध करण्यात आला. भाजपाचे खासदार बृजभूषण चरण सिंह यांनी राज ठाकरेंनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी त्यानंतरच अयोध्येला यावं अशी मागणी केली. बृजभूषण सिंह यांनी याच पार्श्वभूमीवर मोठं शक्तीप्रदर्शन देखील केलं. तसंच ५ जून रोजी अयोध्येत राज ठाकरेंना येऊ देणार नाही. त्यासाठी ५ लाख लोक राज ठाकरेंना अडवतील असं म्हणत बृजभूषण सिंह यांनी शड्डू ठोकला आहे. त्यानंतर राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर ठाम होते. 

पुण्यात २२ मे रोजी सभा होणार
पुण्यात २१ मे रोजी नदीपात्रात होणारी मनसेची जाहीर सभा देखील पावसाच्या शक्यतेमुळे रद्द करण्यात आली होती. पण आता ही सभा २२ मे रोजी सकाळी १० वाजता गणेश कला मंच येथे होणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे. नदीपात्रात जाहीर सभा घेण्याचं आम्ही ठरवलं होतं. पण हवामान खात्यानं त्यादिवशी पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि कार्यक्रत्यांना चिखलात बसवणं योग्य ठरणार नाही. तसंच मंडप वगैरे गोष्टींना देखील काही मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे ही सभा बंद सभागृहात घेण्याचं आम्ही ठरवलं. त्यात पुण्यात सर्वात मोठं सभागृह म्हणजे गणेश कला मंच हेच एक आहे. त्यामुळे या ठिकाणी सभा होईल आणि बाहेर स्क्रिन लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरुन कार्यकर्त्यांना सभा पाहता येईल, असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. याच सभेत आता राज ठाकरे अयोध्या दौरा स्थगित का केला याची माहिती देणार आहेत.

Web Title: MNS Chief Raj Thackeray visit likely to postponed Ayodhya tour due to health reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.