शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

एमएमआरडीएचे प्रकल्प आता खासगी भागीदारीतून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:28 IST

एमएमआरडीएने मुंबई महानगरातील पायाभूत प्रकल्पांच्या जाळ्याचा विस्तार करण्यासाठी आता खासगी भागीदारांचा आधार घेण्याचा विचार सुरु केला.

अमर शैला लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महानगरातील पायाभूत प्रकल्पांच्या जाळ्याचा विस्तार करण्यासाठी आता खासगी भागीदारांचा आधार घेण्याचा विचार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केला आहे. त्यानुसार रस्ते प्रकल्पांची कामे बांधा, वापरा, हस्तांतरीत करा (बीओटी) यासह अन्य कोणत्या पर्यायांनी करता येतील का, याची चाचपणी एमएमआरडीने सुरू केली आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

एमएमआरडीएकडून वाहतूक जलद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू केली आहेत. त्याचबरोबर काही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी एमएमआरडीएला मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. मात्र, बीकेसीतील भूखंड भाडेपट्ट्यावर देऊन मिळणारे उत्पन्न हाच त्यांचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मात्र, या उत्पन्नावरही गेल्या काही वर्षांत मर्यादा आल्याने सध्या एमएमआरडीएच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यातून कर्ज काढून प्रकल्पांची कामे करण्याशिवाय गत्यंतर नाही. परिणामी त्यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी कर्जाव्यतिरिक्त अन्य पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे. एमएमआरडीएने काही दिवसांपूर्वीच कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ मार्गिकेचे काम पीपीपी तत्त्वावर करण्यासाठी स्वारस्य निविदा मागविल्या होत्या. आता त्याच धर्तीवर रस्ते जाळे विस्तारणाऱ्या अन्य प्रकल्पांची कामेही पूर्ण करण्याचा विचार आहे.

एमएमआरडीएने नुकत्याच मीरा-भाईंदर ते गायमुख उन्नत आणि भुयारी मार्ग प्रकल्पाच्या तब्बल १३ हजार कोटी रुपयांच्या निविदा रद्द केल्या आहेत, तसेच या प्रकल्पासाठी कर्ज उभारणी सुरू केली होती. मात्र, हे कर्ज अधिक व्याज दराने मिळण्याची शक्यता आहे. त्यातून आता हा प्रकल्प खासगी भागीदारीतून राबविता येईल का, याचीही चाचपणी सुरू आहे. यासोबतच आगामी प्रकल्पांसाठी हेच धोरण राबविण्यात येणार आहे. त्यातून खर्चाचा भार खासगी भागीदारांवर गेल्याने एमएमआरडीएच्या तिजोरीवरील ताण काहीसा हलका होण्यास मदत मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

बुधवारी दुपारी चार रुग्णवाहिकांमधून चौघांचे पार्थिव आणण्यात आले. मुलगा, सुनेसोबत अद्याप जगही न पाहिलेल्या अवघ्या चार व सहावर्षीय नातवंडांना अखेरचा निरोप देताना जावेदच्या आई, बहिणी व भावाच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी त्यांचे नातेवाईक व समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती. या दुर्दैवी घटनेबाबत उपस्थितांमधून हळहळ व्यक्त केली जात होती. जावेद गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत आला नव्हता. मात्र, आईच्या आजारपणामुळे व ईद साजरी करण्याचा विचार करून तो आला होता, असे जावेदचे बंधू इम्तियाज यांनी सांगितले. 

टॅग्स :mmrdaएमएमआरडीएMaharashtraमहाराष्ट्र