ताफा थांबवून बच्चू कडू धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला, स्वत:च्या गाडीतून जखमींना पोहोचवलं रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 04:08 PM2020-09-05T16:08:45+5:302020-09-05T16:13:39+5:30

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर-अकोट मार्गावर आराळा-बोराळा फाट्याजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक महिला आणि दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहेत.

MLA bacchu kadu help injured rushed to the hospital in their own vehicle | ताफा थांबवून बच्चू कडू धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला, स्वत:च्या गाडीतून जखमींना पोहोचवलं रुग्णालयात

ताफा थांबवून बच्चू कडू धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला, स्वत:च्या गाडीतून जखमींना पोहोचवलं रुग्णालयात

googlenewsNext
ठळक मुद्देदर्यापूर-अकोट मार्गावर आराळा-बोराळा फाट्याजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला.या अपघातात एक महिला आणि दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर बच्चू कडू पुन्हा अकोल्याच्या दिशेने रवाना झाले.

अमरावती - राज्यमंत्री आमदार बच्चू कडू हे सातत्याने वेगळ्या आंदोलनांसाठी चर्चेत असतात. मात्र, यावेळी अपघातग्रस्तांना आपल्या गाडीतून रुग्णालयात पोहोचवल्याने ते चर्चेत आहेत. बच्चू कडू हे नेहमीच रुग्णांची मदत करत असतात. यामुळे रुग्णसेवक म्हणूनही त्यांची ओळख आहे. 

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर-अकोट मार्गावर आराळा-बोराळा फाट्याजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक महिला आणि दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाला त्याच वेळी, राज्यमंत्री बच्चू कडू हे याच मार्गाने अकोला येथे जात होते. मात्र, हा अपघात पाहताच त्यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवला आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली.
 
राज्यमंत्री बच्चू कडू केवळ अपघातग्रस्तांच्या मदतीलाच धावले नाही, तर त्यांनी या अपघातातील जखमींना स्वतःच्या गाडीतून दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातही पोहोचवले आणि दाखल केले. यानंतर ते पुन्हा अकोल्याच्या दिशेने रवाना झाले. या प्रसंगामुळे बच्चू कडू यांची रुग्णसेवक म्हणून असलेली प्रतिमा पुन्हा एकदा पाहायला मिळाली.

यापूर्वी, रोडवरील अपघात पाहून पालकमंत्री भरणेही धावले होते मदतीला -
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे 26 जुलैला सोलापूर आणि बार्शी दौऱ्यावर होते. आपल्या इंदापूर या मूळ गावावरून सोलापूरकडे त्यांचा ताफा जात असताना वाटेत अपघात झाल्याची घटना त्यांच्या निदर्शनास आली. यांतर त्यांनी तत्काळ तत्परता दाखवत जखमींना मदत केली आणि खासगी वाहनाने रुग्णालयात पाठवले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरणे सोलापूर दौऱ्यावर होते.

महत्त्वाच्या बातम्या -

मुंबई काय शिवसेनेच्या बापाची का? कंगनाच्या पाठीशी उभे राहत भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

क्रिकेटशी संबंधित 'या' व्यक्तीला कोरोनाची लागण; सचिन धावला मदतीला, संपूर्ण खर्च उचलणार

लुटारू नवरी! 10 वर्षांत 8 जणांशी केलं लग्न, लाखो रुपयांचा घातला गंडा

पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत 103 कोटी रुपये केले दान; जाणून घ्या, केव्हा, कोठे अणि कशासाठी दिले

Web Title: MLA bacchu kadu help injured rushed to the hospital in their own vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.