शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे मिशन मिहान

By admin | Updated: November 3, 2014 00:39 IST

मुंबईत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून कामाला लागलेले देवेंद्र फडणवीस नागपूरमध्येही कामाचा तोच झपाटा कायम ठेवणार आहेत. सोमवारी रामगिरीवर दोन महत्त्वपूर्ण बैठका आयोजित करण्यात आल्या

रामगिरीवर आज बैठका: नागपूर विभागाचा आढावा घेणारनागपूर: मुंबईत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून कामाला लागलेले देवेंद्र फडणवीस नागपूरमध्येही कामाचा तोच झपाटा कायम ठेवणार आहेत. सोमवारी रामगिरीवर दोन महत्त्वपूर्ण बैठका आयोजित करण्यात आल्या असून त्यात मिहान आणि नागपूर विभागातील विविध योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे.विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यानच सक्रिय होणारी नागपूर विभागातील प्रशासकीय यंत्रणा नागपूरकर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून बैठकीच्या तयारीत व्यस्त आहे. सोमवारी सकाळी १० वाजता मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘रामगिरी’येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मिहान प्रकल्पाच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. आमदार म्हणून काम करताना फडणवीस यांनी नेहमीच मिहान प्रकल्पाचा प्रश्न विधानसभेत वेळोवेळी मांडला व हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूरमध्ये आल्यावर त्यांनी पहिली बैठक मिहान प्रकल्पाच्या संदर्भात आयोजित केली आहे. या बैठकीत मिहान प्रकल्पाशी संबधित प्रश्नांसह वीज आणि उद्योजकांच्या समस्यांवरही चर्चा करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सद्यस्थिती आणि अडचणी याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती असून त्याचा निपटारा करण्यासाठी काही योजनांही त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे काही निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. सत्तेत आल्यास मिहानचा विकास जलद गतीने करू, असे आश्वासन भाजपने निवडणूक प्रचारात दिले होते हे येथे उल्लेखनीय.मिहानची बैठक आटोपल्यावर दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री नागपूर विभागातील विविध विकास कामे आणि योजनांचा आढावा घेतील. संबंधित सर्व विभाग प्रमुखांना या बैठकीस उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. अपूर्ण राहिलेल्या योजना व इतरही कामे पूर्ण करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील यासंदर्भातील प्रस्ताव या बैठकीत सादर केले जाण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)