शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत उंबराच्या फुलाचा वाद पोलिसांत, बुरशी असल्याचा ‘अंनिस’चा दावा

By admin | Updated: October 8, 2016 20:08 IST

मिरजेत किल्ला परिसरात उंबराच्या झाडावर फूल आल्याच्या घटनेमुळे शनिवारी दर्शनासाठी एकच गर्दी जमली

ऑनलाइन लोकमत
मिरज, दि. 8 -: मिरजेत किल्ला परिसरात उंबराच्या झाडावर फूल आल्याच्या घटनेमुळे शनिवारी दर्शनासाठी एकच गर्दी जमली. त्यानंतर अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी धाव घेत उंबराच्या झाडाचे फूल नसून, बुरशी आल्याचा दावा केला. याबाबत वाद निर्माण होऊन प्रकरण पोलिसांत गेले.
 
किल्ला भागात सुनील सुर्वे या शिक्षकाच्या घरात दत्त मंदिर व उंबराचे झाड आहे. फांदीला शनिवारी सकाळी पिवळ्या रंगाचे फूल आल्याचे दिसले. ही दुर्मिळ घटना व दैवी चमत्कार असल्याचा गवगवा झाल्याने फूल पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. महिलांनी उंबराच्या झाडाची पूजा केली. उंबराच्या झाडाखाली असलेल्या दत्त मंदिरात होमहवन यासह धार्मिक कार्यक्रम करण्यात आले.
 
याबाबत माहिती मिळाल्यानंतर अंश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. प्रदीप पाटील, ज्योती आदाटे व कार्यकर्ते तेथे आले. त्यांनी वनस्पतीशास्त्रानुसार उंबराच्या झाडाला फूल येत नसून, फुलाच्या आकारातील विशिष्ट बुरशी असल्याचे सांगितले. त्यांनी नागरिकांचेही प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, मात्र फुलाचे दर्शन घेण्यासाठी महिला येतच होत्या.
सुनील सुर्वे यांच्याकडून बुरशीला उंबराचे फूल म्हणून भासवून फसविण्याचा प्रकार सुरू असल्याची तक्रार अंधश्रध्दा निर्मूलन समितीने पोलिसांत दिली. याबाबत सुनील सुर्वे यांच्यावर कारवाईची मागणी केली, तर सुर्वे यांनी कोणालाही फसविले नसल्याचा दावा केला. उंबराच्या झाडावर उमललेल्या कथित फुलामुळे रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात वाद सुरू होता.