Radhakrishna Vikhe Patil: राज्यात चमत्कार होऊ शकतो; राधाकृष्ण विखे पाटलांचे सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 02:16 PM2021-09-18T14:16:53+5:302021-09-18T14:17:41+5:30

Radhakrishna Vikhe Patil on BJp-Shivsena: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भविष्यातील सहकारी असे वक्तव्य एका भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या कार्यक्रमात केले होते. या आधी भाजपाकडूनच अशी वक्तव्ये होत होती. परंतू ठाकरेंनीच असे वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Miracles can happen in the Maharashtra; Indicative statement of Radhakrishna Vikhe Patil | Radhakrishna Vikhe Patil: राज्यात चमत्कार होऊ शकतो; राधाकृष्ण विखे पाटलांचे सूचक वक्तव्य

Radhakrishna Vikhe Patil: राज्यात चमत्कार होऊ शकतो; राधाकृष्ण विखे पाटलांचे सूचक वक्तव्य

Next

अहमदनगर : राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो. तसेच कोणीही कायमचा मित्रही नसतो. त्यामुळे कोणताही चमत्कार होऊ शकतो, असे सूचक वक्तव्य माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. (Radhakrishna Vikhe Patil says Shiv sena-Bjp can come together in Maharashtra)

अहमदनगर येथे एका महाविद्यालयातील विस्तारीत इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यात महाविकास आघाडीची मोट बांधली आहे, त्याला कोणताही वैचारिक आधार नाही. सत्तेसाठी हे लोक एकत्र आलेले आहेत. सत्ता नसतानाही भाजप-शिवसेना २५-२५  वर्षे एकत्र काम करत होती. त्यामुळे भविष्यात हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्याचं स्वागतच केले पाहिजे, असेही विखे पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भविष्यातील सहकारी असे वक्तव्य एका भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या कार्यक्रमात केले होते. या आधी भाजपाकडूनच अशी वक्तव्ये होत होती. परंतू ठाकरेंनीच असे वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावरून राज्यात सत्तांतर होते की काय किंवा शिवसेना सत्तेतील वाटेकरी बदलते की काय अशा चर्चा रंगल्या होत्या. 

Web Title: Miracles can happen in the Maharashtra; Indicative statement of Radhakrishna Vikhe Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app