शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री वायकर यांचे सहा ‘झोपु’ प्रकल्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2016 04:58 IST

गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर चांगलेच अडचणीत सापडले आहेत. वायकर यांच्या भागीदारीत अंधेरी आणि जोगेश्वरी पूर्वेला सहा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सुरू

मुंबई : गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर चांगलेच अडचणीत सापडले आहेत. वायकर यांच्या भागीदारीत अंधेरी आणि जोगेश्वरी पूर्वेला सहा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सुरू असून, त्यांची किंमत सुमारे १००० कोटी एवढी आहे. ऐश्वर्या लाईट्स आणि ऐश्वर्या अवंत या वायकर यांच्याच कंपन्या आहेत, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केला. स्पोर्ट्स क्लबच्या नावे पालिकेचा भूखंड हडप केल्याचा आरोप त्यापूर्वीच झाला आहे. आता त्यांच्या भागीदारीत इन्कलाब नगर, राजश्री निवास अंधेरी पूर्व, श्यामनगर, महाकाली गुंफेजवळ, अंधेरी रामबागमध्ये २ प्रकल्प असे सहा अनधिकृत प्रकल्प सुरू असल्याचे समोर आले आहे. त्याचे सुमारे साडेतीन लाख स्केअर फूट एवढे अनधिकृत बांधकाम झालेले आहे. हरमीत सिंग गुप्ता हा या कंपन्यांचा मूळ मालक असून, वायकर भागीदार आहेत. हरमीतला पुढे करून वायकर सगळे प्रकल्प राबवित आहेत. या सर्व प्रकल्पांना वायकर यांनी मंत्री पदाचा दुरुपयोग करून जलदगतीने मंजुरी मिळवली आहे, असा आरोप निरुपम यांनी केला आहे.गृहनिर्माण राज्यमंत्री पदाचा दुरुपयोग करून वायकर कंपन्यांना फायदा करून घेत आहेत. प्रकल्पांच्या मंजुरीसाठी वायकर यांनी शासकीय निवासस्थानी बैठका घेतल्या. शिवाय, त्यांनी आपल्या प्रकल्पांना ‘ना विकास क्षेत्रा’त आणि ‘प्रतिबंधित क्षेत्रा’त ही परवानगी दिली आहे. या परवानग्या त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा दुरुपयोग करून अनधिकृतपणे मिळविलेल्या आहेत, असे निरुपम यांनी म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)पदावरून दूर करा...जोगेश्वरी गुफा संरक्षित असून, त्याच्या १०० मीटर परिसरात बांधकाम करू नये, असा पुरातत्त्व विभागाचा नियम आहे. न्यायालयाचेही तसे आदेश आहेत. तरी नियम धाब्यावर बसवून वायकर यांच्या भागीदारीतील एसआरए प्रकल्प तिथे सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वायकर यांना ताबडतोब मंत्री पदावरून दूर करावे, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली.२०११ला मी ऐश्वर्या लाईट्स कंपनीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे निरुपम यांचे सर्व आरोप निराधार आहेत.-रवींद्र वायकर, गृहनिर्माण राज्यमंत्री